नाशिक

रस्त्यांसाठी चार तास महामार्ग रोखला

आश्वासनानंतर आंदोलन मागे; हरसुले फाट्यावर 250 ग्रामस्थांचा एल्गार

सिन्नर : प्रतिनिधी
मंजूर कामांना मुहूर्त मिळेना, नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती होईना आणि देवनदी नदीजोड प्रकल्पातून गावेच वगळली गेल्याने संतप्त झालेल्या धोंडबार, औंढेवाडी व पाचपट्टा येथील ग्रामस्थांनी सोमवारी (दि.5) सिन्नर-घोटी महामार्गावर आक्रमक पवित्रा घेतला.
हरसुले फाट्यावर सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत तब्बल चार तास रास्ता रोको करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आठ दिवसांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आश्वासन पाळले नाही तर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
या आंदोलनात सुमारे 200 ते 250 ग्रामस्थ सहभागी झाले होते. राजेश शिंदे, राहुल साबळे, सागर खेताडे, दीपक खेताडे, विलास कुंदे, मारुती कुंदे, वनिता जाधव, सुनीता खेताडे, भगवान खोकले तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
आठ दिवसांची डेडलाइन
धोंडबार-पाचपट्टा या मंजूर रस्त्याचे काम आठ दिवसांत सुरू करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले. धोंडबार-औंढेवाडी रस्त्याचे टप्प्याटप्प्याने मंजूर झालेले काम पूर्ण करण्यात येणार आहे. मंजूर नसलेल्या रस्त्यांवरील खड्डे डांबराने बुजविण्यात येतील, तर अन्य रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले. देवनदी नदीजोड प्रकल्पातून धोंडबार व औंढेवाडीला वगळल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी आक्रमकपणे मांडला. याबाबत आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर या विषयाची माहिती ग्रामसभेत देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

पोलिसांच्या मध्यस्थीने तोडगा

रास्ता रोको सुरू होताच पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. त्यांच्या मध्यस्थीने तहसीलदार सुरेंद्र देशमुख, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश देवरे आणि नांदूरमध्यमेश्वर पाटबंधारे विभागाचे प्रकल्प अधिकारी रितेश जाधव यांच्यासोबत आंदोलकांची चर्चा झाली. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडीही घटनास्थळी तैनात होती.

पोलिसांच्या नियोजनामुळे कोंडी टळली

महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. घोटीकडून येणारी वाहतूक खापराळे फाट्यावरून, तर सिन्नरहून घोटीकडे जाणारी वाहतूक लोणारवाडी बायपास पुलावरून पास्ते मार्गे, लोणारवाडी येथून पालखी मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे आंदोलनस्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली नाही.

Highway blocked for four hours over roads issue.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

7 hours ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

7 hours ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

7 hours ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

7 hours ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

7 hours ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

8 hours ago