नाशिक

सिन्नरमध्ये 24 तासांत दोन बिबटे जेरबंद

मध्यरात्री पिंजर्‍यात अडकला 5 ते 6 वर्षांचा नर बिबट्या

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहरातील उपनगरात बिबट्या पकडल्याच्या दुसर्‍याच दिवशी ढोकी फाटा परिसरात आणखी एक नर बिबट्या पिंजर्‍यात अडकला. सोमवारी (दि. 5) मध्यरात्री 12 वाजता सोपान शिंदे यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजर्‍यात हा बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ढोकी फाटा परिसरातील शिंदे मळ्यात बिबट्याचा वावर असल्याची माहिती शनिवारी (दि. 3) वन विभागाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी तानाजी भुजबळ, वन्यजीव बचाव पथकातील निखिल वैद्य व रोहित लोणारे यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर शनिवारी सकाळीच शिंदे मळ्यात पिंजरा लावण्यात आला. वन विभागाचे पथक बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अखेर सोमवारी मध्यरात्री बिबट्या पिंजर्‍यात अडकला. पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले. पाच ते सहा वर्षांचा हा नर बिबट्या असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी मोहदरी वन उद्यानात हलविण्यात आले आहे.

Two leopards captured in Sinnar within 24 hours.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

7 hours ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

7 hours ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

7 hours ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

7 hours ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

7 hours ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

8 hours ago