महाराष्ट्र

वर्‍हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू

पालघर : प्रतिनिधी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वर्‍हाड्यांना घेऊन जाणार्‍या एका आयशर ट्रकला भरधाव कंटेनरने भीषण धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली आणि वर्‍हाड्यांचा ट्रक पूर्णपणे चेंदामेंदा झाला, ज्यामुळे अनेक प्रवासी गाडीच्या अवशेषांमध्ये अडकून पडले होते. पालघर जवळील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानिवरी गावाजवळ हा अपघात झाला. बालाराम दांडेकर नावाच्या तरुणाच्या साखरपुड्याच्या समारंभासाठी हे सर्व वर्‍हाडी ट्रकमधून प्रवास करत होते आणि या ट्रकमध्ये महिला व लहान मुलांसह जवळपास 100 प्रवासी होते. वर्‍हाडाचा हा ट्रक नवरीच्या घराच्या काही अंतरावर पोहोचला असतानाच समोरून येणार्‍या एका वेगवान कंटेनरचा मागील भाग अचानक निसटला. हा कंटेनर बॉक्स थेट या वर्‍हाडाच्या ट्रकवर जाऊन आदळला.

Horrific truck accident in Varhada; 12 people killed

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

11 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

11 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

11 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

11 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago