नाशिक

धरण समूहात अवघा 31.59 टक्के साठा

जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानात मोठी वाढ झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील धरणांतील साठ्याचे बाष्पीभवन होऊन पाणीपातळी खालावत असल्याचे चित्र आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील धरण समूहात अवघा 31.59 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यात अधिक तीव्र झाल्या आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून, अनेक तालुक्यांत प्रशासनाच्या वतीने टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. या टँकरच्या माध्यमातून पाणीटंचाई असलेल्या गाव-खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. मात्र, यंदा उन्हाळा तीव्र असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन पातळीत खालावली जात आहे. अनेक धरणे कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.

गंगापूर धरणात 42.38 टक्के पाणी

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 42.38 टक्के साठा आहे. परिणामी शहरातदेखील पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सिंहस्थाच्या विकासकामांसाठी अनेक भागांत खोदकाम सुरू असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जूनमध्ये नियोजित वेळेत जर पाऊस झाल नाही, तर यंदा जिल्ह्याला मोठ्या पाणीटंंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धरण समूहातील पाणीसाठा

गंगापूर धरण समूह – 47.07
पालखेड धरण समूह – 22.14
ओझरखेड – 26.78
दारणा – 26.15
भोजापूर – 71.19
गिरणा खोरे धरण समूह – 34.36
एकूण धरणसाठा – 31.59

Only 31.59 percent of the reservoir is in the dam complex.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago