’आयआरजीसी’ची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले
नवी दिल्ली :
इराणच्या इस्लामिक रिव्होेल्यूशनरी गार्ड कॉर्प्स यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणारी दोन जहाजे जप्त केली आहेत. ही जहाजे जप्त करून इराणकडे नेली जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोनपैकी एक जहाज भारताकडे येणार होते. भारताकडे येणारे जहाज दुबईतून निघाले होते, ज्यावर लिबेरियाचा ध्वज लावलेला होता.
एएफपीच्या रिपोर्टनुसार आयआरजीसीच्या नौदलाने सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नियमांचा भंग करणार्या दोन जहाजांना ताब्यात घेतले आहे. आयआरजीसीने दोन जहाजे जप्त केली असून, ती इराणकडे नेली जात आहेत. जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, इराणकडून जप्त करण्यात आलेले जहाज एपामिनोंडास हे गुजरातच्या मुंद्रा पोर्टकडे निघाले होते. जहाज दुबईतून निघाले होते आणि ते गुजरातमध्ये पोहोचणार होते. मात्र, आयआरजीसीने जहाजावर हल्ला करत ते ताब्यात घेतले आहे. भारताकडे जाणार्या जहाजाच्या जप्तीमुळे सप्लाय चेन संदर्भातील भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.
इराणच्या आयआरजीसीने पश्चिम आशियातील अमेरिकन तेल कंपन्या आणि तेलविहिरींवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही धमकी देण्यात आली आहे. इराणकडून धमकी देण्यात आली की, अमेरिकेकडून त्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करण्यात आल्यास पश्चिम आशियातील अमेरिकेच्या जितक्या तेल विहिरी आहेत त्या उदध्वस्त केल्या जातील. इराणने स्पष्ट केले की अमेरिकेची मालकी असलेल्या तेल कंपन्यांवर हल्लेे केले जाऊ शकतात.
India will never bow down to terrorism
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…