महाराष्ट्र

व्यावसायिक गॅसचा भडका; एलपीजी सिलिंडर 195 रुपयांनी महागला

नवी दिल्ली :
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कंपन्यांनी अखेर बुधवारी (दि. 1 एप्रिल) व्यावसायिक एलपीजीच्या सिलिंडरमध्ये 195.50 रुपयांची वाढ केली. ही दरवाढ 19 किलोच्या सिलिंडरना लागू आहे. तथापि, सरकारी कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. घरांमध्ये वापरल्या जाणार्‍या एलपीजी गॅसचे दर जैसे थेच आहेत. मात्र, व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोेलियम आणि हिंदुस्तान पेट्रोेलियम या कंपन्या आंतरराष्ट्रीय निकष व विनिमय दरांवर आधारित राहून, दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एव्हिएशन टर्बाईन फ्युएल आणि एलपीजीच्या किमतींमध्ये सुधारणा करतात.
जागतिक तेल किमतींमध्ये वाढ
पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जापुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययांमुळे, जागतिक तेल किमतींमध्ये सुमारे 50 टक्यांची वाढ झाली आहे. याचा परिणाम एलपीजीच्या किमतींवरही दिसून येत आहे. दुसरीकडे, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या तुटवड्याच्या खोट्या बातम्या वणव्यासारख्या पसरत आहेत. पेट्रोेलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही केवळ एक अफवा असल्याचे सांगितले आहे. सत्य हे आहे की देशात पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.

गृहिणींना तूर्तास दिलासा

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत सरकारने वाढ केली असली, तरी घरगुती एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 7 मार्च 2026 रोजी 60 रुपयांनी वाढविण्यात आली होती. दिल्लीमध्ये हा सिलिंडर आता 913 रुपयांना उपलब्ध आहे. यामुळे येणार्‍या काळात सरकार घरगुती गॅसच्या किमती वाढविते का, ते पाहावे लागेल.

19 किलोचा सिलिंडर दोन हजारांवर

व्यावसायिक सिलिंडरांच्या किमतींमधील ही वाढ हा जागतिक तेल किमतींमध्ये झालेल्या वाढीचा थेट परिणाम असल्याचे बोलले जात आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर, दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 2,078.50 रुपये इतकी झाली आहे. यापूर्वी 1 मार्च रोजी सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 114.50 रुपयांनी वाढवली होती.

 

Judicial custody in the morning; Kharat back in SIT custody in the afternoon

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

3 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

3 hours ago