नाशिकरोडमध्ये ठाकरे गटाला खिंडार, बबन घोलप हाती घेणार कमळ

नाशिक: प्रतिनिधी

शिर्डी लोकसभा मतदार संघात उमेदवारी न दिल्यामुळे नाराज होत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तेथे मन न रमल्याने पुन्हा ठाकरे गटात आलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला आहे. जनतेची कामे करण्यासाठी आता त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाला हा आणखी एक धक्का मानला जात आहे. मागच्याच आठवड्यात उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली होती, ते देखील भाजपच्या वाटेवर असतानाच बबन घोलप यांचीही वाटचाल भाजपकडे आहे. दुसरीकडे शरद पवार गटात असलेले अशोक सातभाई  यांनीही शरद पवार गट सोडण्याचा निर्णय घेतला असून ते देखील भाजपात प्रवेश करणार आहे, बबन घोलप हे माजी मंत्री असून त्यांचा मुंबईत लवकरच प्रवेश सोहळा होणार असल्याने भारतीय जनता पार्टी नाशिक महापालिकेच्यादृष्टीने जोरदारपणे कामाला लागली असून संघटन वाढीसाठी इतर पक्षातील नाराजाना खेचत आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

44 seconds ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago