नाशिक

खरात देशातून पळून जाणार होता; त्याला क्लीन चिट नाही

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वाचला खरात प्रकरणाचा संपूर्ण पाढा

मुंबई : विशेष प्रतिनिधी
नाशिकच्या बलात्कारी, विकृत अशोक खरात प्रकरणाचे पडसाद मंगळवारी विधानसभेत जोरदारपणे उमटले. विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारला धारेवर धरले असता, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उठून सभागृहात सविस्तर निवेदन केले. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या व्यक्तीने आपल्या तथाकथित दैवी शक्तींचा दुरुपयोग करून अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केले आहे. हा महिलांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणालाही सोडले जाणार नाही, असे फडणवीस यांनी ठणकावले. जो क्लीन आहे, त्यालाच क्लीन चिट मिळते. ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल, त्यालाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले.
मुख्यमंत्र्यांनी खरातच्या गुन्हेगारी कार्यपद्धतीचे सभागृहात तपशीलवार वर्णन केले. 2024 मध्ये शिर्डीतील एका महिलेने तक्रार दाखल केली. तपास अधिकार्‍यांनी काही व्हिडीओ तपासले असता त्यात 8 महिलांचे 35 व्हिडीओ आढळले. खरातने जादूटोणा, तंत्रमंत्र आणि भोंदूगिरीचा वापर करून या महिलांवर बलात्कार व अश्लील कृत्ये केल्याचे स्पष्ट झाले. एका पीडितेच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला, हे सभागृहात मुख्यमंत्र्यांनी सांगितले असता सदस्यांमध्ये संताप उसळला. खरातविरुद्ध आतापर्यंत 5 पीडित महिलांच्या जबाबावरून 5 सहित एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरित आणखी महिला तक्रार देण्यासाठी पुढे येणार असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

पोलिसांची संरक्षणाची हमी, साक्षीदाराची मदत

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, खरातच्या अटकेआधीच म्हणजे 10 मार्च रोजी दुसर्‍या जिल्ह्यातून दाखल झालेल्या तक्रारीचा आधार घेत त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, जेणेकरून तो परदेशात पळू नये. या प्रकरणाचा उलगडा करण्यात साक्षीदाराची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, खरातकडून जीविताच्या भीतीमुळे तो सुरुवातीला पुढे येण्यास तयार नव्हता. पोलिसांनी संरक्षणाची हमी दिल्यानंतर त्याने व्हिडीओ सुपूर्द केले.

Kharat was about to flee the country; he does not have a clean chit

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

45 minutes ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

53 minutes ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

58 minutes ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

1 hour ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

1 hour ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

1 hour ago