संपादकीय

लखमापूरची शान क्रिकेटर भाविका अहिरे

चिखलात कमळ फुलते तशी घटना लखमापुरात घडली व गावची शान वाढली. लखमापूरचे सामान्य शेतकरी कुटुंब व या कुटुंबातील स्व. संपत राजाराम अहिरे हे नातेवाइकांच्या मदतीने पोटापाण्यासाठी मुंबईत स्थिरावले. साधा सरळ माणूस पण कष्ट व जिद्द यामुळे मुंबईत चांगल्या स्थितीत आले. मनोज अहिरे या मुलाने व पूनम हिने भाविकाला जन्म दिला. मुलगी म्हणजे नकोशी पण याच भाविकाने क्रिकेटविश्वात दमदार सुरुवात केली. 2013 ला नोकरीनिमित्त मनोज व पूनम पुण्यात भोसरीत स्थायिक झाले. या भाविकाने मोशी व भोसरीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले व आता पुण्याच्या एस. पी.कॉलेजला वाणिज्य शाखेत शिकत आहे.
भाविकाच्या वडिलांचे बालपण मुंबईत गेले व त्यांना टेनिस खेळण्याची आवड होती व भाविकाला क्रिकेटची आवड लक्षात आल्यावर क्रिकेट अकॅडमीत दाखल केले. शिक्षणासोबत क्रिकेटची आवड सुरू झाली. 10 व्या वर्षापासून पुण्याच्या कासारवाडीतील ओमसाई क्रिकेट अकॅडमीत संजय हाडके यांनी तिला प्रशिक्षण दिले. भाविका फलंदाज व विकेटकिपर राज्य संघात खेळत होती व या काळात मुलांच्या संघातून भाविका एकटीच मुलगी खेळाडू होती.
कोविड महामारी काळात घरात बसून क्रिकेटचा अभ्यास सुरू ठेवला व कोरोना काळातील अभ्यासच तिच्या कामी आला. 2022-23 मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंधरा वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट सामन्यामध्ये दमदार फलंदाजी करून लखमापूरच्या भाविकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले व लगेच झालेल्या बडोदा संघाविरुद्ध सराव सामन्यात नाबाद 113 धावांची शतकी खेळी खेळून निवड संघाला प्रभावित केले व त्यामुळे बीसीसीआयच्या 15 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट मालिकेसाठी भाविका राज्य संघाची थेट कर्णधार झाली.
या स्पर्धेच्या पदार्पणातच मुंबई संघाविरुद्ध भाविाने 129 धावांची शतकी खेळी केली व या सर्व सामन्यातील तिची अव्वल कामगिरी बघून तिने फलंदाजांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकाचे स्थान मिळवले. महा. क्रिकेट असोसिएशनने पंधरा वर्षांखालील प्रतिभावान महिला फलंदाज म्हणून सन्मानचिन्ह देऊन तिला गौरवण्यात आले. तिचा खेळ व सराव सुरूच होता व दुसर्‍याच वर्षी 2023 /24 मध्ये बीबीसीआयच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघातून पदार्पणाच्या सामन्यात मेघालय संघाविरुद्ध खेळताना 119 धावांची शतकी खेळी खेळून स्वतःला सिद्ध केले. 2023 -24 ला भाविका 23 वर्षांखालील महिला संघातून खेळली व तिने 53 धावांची अर्धशतकी खेळी करून पण संघाचा पराभवच झाला. 2024 मध्ये मे महिन्यात झालेल्या बीसीसीआय चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत भाविकाने नाबाद 83 धावांची खेळी करून परत एक टप्पा वर सरकली. नंतर 19 वर्षांखालील साऊथ आफ्रिका संघासोबत झालेल्या सराव सामन्यात छान कामगिरी केली. लगेच डिसेंबर 2024 मध्ये एसीसीच्या पहिल्या 19 वर्षांखालील महिलांच्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली व या सामन्यात भारताने अजिंक्यपद पटकावले. जानेवारी 2025 मध्ये आयोजित आयसीसी 19 वर्षांखालील महिलांच्या टी-20 वर्ल्डकप
स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली व भारताने दुसर्‍यांदा टी-20 मध्ये वर्ल्डकप स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या सामन्यातील कामगिरीमुळे 2026 मध्ये बीबीसीआयच्या वतीने सर्व खेळाडूंना नमन अवॉर्डने गौरवण्यात आले व संघाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवारांच्या हस्ते मंत्रालयात सन्मान करण्यात आला. महा. क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आ. रोहित पवारांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
2025-26 मध्ये भाविकाचा महा. क्रिकेट असोसिएशनने भाविकाची फलंदाजी व विकेटकिपिंग बघून बीसीसीआयच्या सर्व गटांत टी-20 व वन डे स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली. कमी वय असून, वरिष्ठ महिला संघात अजिंक्यपद मिळवले. 23 वयोगटात खेळताना अंतिम सामन्यात कर्नाटक विरुद्ध भाविकाने 109 धावा काढून सामनावीर ठरली व सर्व सामने जिंकल्याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार मिळवला. आता सततच्या यशस्वी
खेळामुळे भाविका नॅशनल क्रिकेट अकॅडमी, बंगलोर येथे उच्च क्रिकेट प्रशिक्षण शिबिरासाठी निवड होऊन भाविकाचा चढता आलेख वाढतच आहे. अशा लखमापूरच्या भाविका अहिरेला लखमापूरकरांच्या वतीने भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा! एक दिवस गावाचे नाव जागतिक पातळीवर जाईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Lakhmapur’s pride cricketer Bhavika Ahire

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago