राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

ऑस्कर 2027 मध्ये मराठी ‘गोंधळ’ गाजणार

नवी दिल्ली : 99 व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर 2027) ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी ही
घोषणा केली.
मराठी लोकपरंपरेवर आधारित असलेला हा थ्रिलर चित्रपट ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट या श्रेणीत सादर केला जाईल. यावर्षी ऑस्करच्या शर्यतीत भारताकडून धुरंधर, बॉर्डर 2 आणि हनुमान अंश यांसह 33 चित्रपटांनी प्रवेशिका दाखल केल्या आहेत. यंदाच्या ऑस्करच्या दावेदारीसाठी देशभरातील विविध भाषांमधून एकूण 33 चित्रपट पाठविण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक 14 चित्रपट हिंदी भाषेतील होते. याशिवाय मराठी, तेलुगू आणि गुजराती भाषांमधून प्रत्येकी 4 चित्रपट, तमिळमधून 3 चित्रपट, तर मल्याळम आणि नागामी भाषांमधून प्रत्येकी 1 चित्रपटाचा समावेश होता.
गोंधळ : थ्रिलर चित्रपट
दोन तासांच्या रनटाइमचा हा मराठी चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रातील लोकपरंपरा आणि धार्मिक विधी ‘गोंधळ’ यांवर आधारित एक मानसशास्त्रीय थ्रिलर आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. चित्रपटाची कथा नवविवाहित जोडपे आनंद आणि सुमन यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या रात्रभर चालणार्‍या गोंधळ विधीभोवती फिरते. पूजाअर्चा आणि उत्सवादरम्यान गावकर्‍यांमधील दडलेले जुने वाद, वैयक्तिक वैर आणि राजकीय तणाव उफाळून येऊ लागतात. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहणी, निषाद भोईर आणि सुरेश विश्वकर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे संगीत इलय्याराजा यांनी तयार केले आहे. याच निर्मितीसाठी दिग्दर्शक संतोष डावखर यांना इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये सिल्व्हर पीकॉक (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) पुरस्कारही मिळाला आहे.
13 सदस्यीय ज्युरी पॅनेलने घेतला निर्णय- चित्रपटाच्या निवडीसाठी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने एका विशेष ज्युरीची स्थापना केली होती. या ज्युरी पॅनेलमध्ये पी. शेषाद्री, विजय पाटकर, हितू कनोडिया, शांती कुमार, संदीप पराशर, संजय पाटील, साबू जोसेफ, अनिल थॉमस, विवेक वासवानी, बिजॉन दासगुप्ता, हासन, वासन आणि तनिष्ठा चटर्जी यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. ज्युरी सदस्यांनी सर्व प्रवेशिकांचे सखोल परीक्षण केल्यानंतर या मराठी थ्रिलरची ऑस्कर 2027च्या मंचावर पाठवण्यासाठी निवड केली.

Marathi ‘Gondhal’ to make waves at the 2027 Oscars

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

8 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

8 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

8 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

8 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

9 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

9 hours ago