– अशोक थोरात
रविवार, 17 मेच्या दै. गांवकरीतील ‘समाजाची अधोगती’ या लेखाला प्रचंड समर्थन मिळाले. अमेरिका, मुंबई, पुणे, नाशिकसह किमान शंभर अनोळखी फोन आले. लेख आवडला म्हणून. समाजाच्या मनातील खदखद समोर आली व लोकांना लेख भावला. अनेकांनी काही सूचना केल्या. वैदिकबाबत काही गुरुजींनी, प्राध्यापकांनी सांगितले ते धक्कादायकच आहे. वैदिक विवाह चूक का बरोबर, यावर दोन मते समोर आली. विवाह आयुष्यात एकदाच होतो. मंगळसूत्र बांधले, माळा टाकल्यानंतरचे सर्व उद्योग म्हणजे निव्वळ उधळपट्टी आणि पैसे कमावण्याचा धंदा आहे. कोर्ट मॅरेजमध्ये अधिकार्यासमोर हार, मंगळसूत्र विषय संपलेला असतो व नंतर परत वाजतगाजत विवाह सोहळा म्हणजे जनतेला मूर्ख बनवायचा प्रकार आहे. खरे बोलायचे तर पळून कोठे आळंदी, शिर्डी, त्र्यंबकेश्वरला मंदिरात लग्न लागल्यानंतर कुटुंबातील अनेकांचा संताप वाढतो. विवाहितांना कापू का मारू, असा राग व्यक्त होतो. काही विवाहाच्या आधीच कुटुंबाच्या हाती सापडतात व वरात पोलीस स्टेशनमध्ये जाते. दोघे एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत, यावर ठाम असतात. शेवटी सज्ञान असल्याने पोलिसांनी रागावलेल्यांची समजूत काढून पोलीस स्टेशनलाच अनेक विवाह झाले आहेत. अशावेळी फार नाक कापले गेले, समाजात अब्रू गेली या नादान विचाराने समाजाला बनवण्यासाठी मोठे लग्न लावले जाते. हे लग्न मूर्खपणाचा कळस होय. समाज आंधळा, मुका, बहिरा नाही. दिवट्यांनी जे केले ते सर्वांना समजते. मग वेळ काळ ओळखून प्रवाहात सामील झाले पाहिजे. बर्याच ठिकाणी ‘सैराट’मधील आर्ची व परशासारख्या घटना पण घडलेल्या आहेत. माझ्या परिचित कुटुंबातील मुलीने पळून जाणे पसंत केले. मुलीच्या कुटुंबीयांनी रात्री मुलाच्या घरी गोंधळ घातला. पोलिसांनी शांतता केली. सकाळी मुलीचा बाप माझ्याकडे आला. रडारड करून संताप करीत होता. मी शांत केले. स्वतःसह वीस-पंचवीस जवळचे सोबत घेतले. मुलीला म्हटले, काय हे आई-बापाचा विचार करून संपवा हा विषय. तिने मला थेट मंगळसूत्र दाखवले. आताच मंदिरात लग्न लावल्याचे सांगितल्यावर मला पलटी मारावी लागली. मुलीच्या बापाने संताप केला. शांत झाला म्हटलं हे मिटवले नाही तर ‘सैराट’ची पुनरावृत्ती होईल. गोड बोललो. त्यांना घरासमोर लग्न लावायला सांगितले व सर्व तणाव संपवत हळूच म्हटलं, आम्हाला पिठलं-पोळी खायला घाला, कारण तणाव संपवायचा तो उपाय होतो. डोके फुटायची शक्यता अचानक एकत्र जेवणात बदलवली. यांना खूप समजावले. गोडीत लग्न होऊ द्या, मुलगी परकी करू नका. लग्नानंतर जेवण करून गोडीत निघून येऊ असे ठरवले. व्हायचे तेच झाले. मुलगी सासरी व यांचे संबंध बिघडले. मला धक्का बसेल असे दोन वर्षांत घडले. सर्व आजही गोड आहेत. सांगायचे तात्पर्य आहे, त्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. जेंव्हा विवाह सोहळा होतो तेंव्हा ठरलेल्या वेळी देव देवता आशिर्वाद द्यायला येतात. व वेळ टळली तर निघून जातात. जातांना डी.जे.समोर नाचणार्या भुतांना देव बघतात. शेवटी विवाह सा संस्कार असतो थोडी काळजी घेतली पाहिजे. तीन चार तास लग्न उशिरा लावले जाते. त्यासाठी नाचणारे थकणार नाहीत असे पेय पाजले जाते हे पण कटु सत्य आहे. डी.जे. बंद करा, मधुर संगीताचे वाद्य लावा. छत्रपती शिवाजी महारांची आरती बंद करा. हवे तर पोवाडा लावा व महाराजांचा जयजयकार करा बघु थोडा बदल झाला तर . आणि बुफे डिनर अयोग्य आहे. कोणत्याही कार्यक्रमात आंम्ही जास्तच पुढारलेले आहोत हे दाखवायच्या नादात जेवणारा भिकारी होतो
Marriage method: I understand but I don’t change!
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…