– अनुराधा सोनवणे
आज अनेक लोक शारीरिकदृष्ट्या जिवंत असतात, पण आतून त्यांच्या आशा, स्वप्ने आणि जगण्याची ऊर्जा हळूहळू मरत असते. आत्महत्या नेहमी शरीराचीच होत नाही; अनेक वेळा माणूस दररोज स्वतःच्या आशा, विचार आणि क्षमतांची आत्महत्या करत जगत असतो.
जेव्हा व्यक्ती स्वतःवरचा विश्वास गमावते, तेव्हा जीवनातील शक्यता दिसेनाशा होतात. स्वप्ने संपणे, आशा तुटणे आणि विचार करण्याची शक्ती हरवणे – हीदेखील शांतपणे घडणारी
आत्महत्या आहे.
जीवनाचा खरा अर्थ फक्त जिवंत राहण्यात नाही तर आपल्या सर्वोच्च शक्यतेपर्यंत पोहोचण्यात आहे. जेव्हा माणूस विचार करणे थांबवतो, आशा सोडतो आणि स्वतःच्या शक्यतांवरचा विश्वास गमावतो – तीदेखील आत्महत्या आहे. आत्महत्या म्हणजे फक्त शरीराचा अंत नाही ती आनंद, उत्पादकता, स्वप्ने आणि वाढ थांबण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आत एक उच्च शक्यता जिवंत असते आणि योग्य व्यवस्थापन माणसाला त्याच्या
सर्वोत्तम शक्यतेकडे नेते. आत्महत्या ही कमजोरी नसून एक मोठी शक्ती आहे – एक अशी ज्वाला जी माणसाच्या आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता घेऊन येते. परंतु, काही चुकीच्या निर्णयांमुळे ती शक्ती चुकीच्या दिशेला वळते.
आत्महत्या करण्याचा विचार करणारे लोक कमकुवत नसतात. त्यांच्या आत प्रचंड ताकद, जिद्द आणि ऊर्जा दडलेली असते. इतिहास घडवण्यासाठी जी शक्ती आवश्यक असते, तीच शक्ती त्यांच्या आत असते. फक्त त्या शक्तीचा योग्य वापर करण्यात चूक होते.
चुकीचे विचार, भावनिक तणाव आणि दिशाहीन प्रतिक्रिया यामुळे व्यक्ती जीवनाचा खरा हिशोब आणि व्यवस्थापन विसरते. जे लोक आपल्या जीवनाचा योग्य विचार, भावनिक व्यवस्थापन आणि मानसिक दिशा शिकतात, ते प्रत्येक अडथळा पार करून अद्भुत इतिहास घडवू शकतात. अनेकदा लोकांमध्ये असलेली ती तीव्र ऊर्जा एका चुकीच्या क्षणी संपून जाते; पण जर तीच ऊर्जा योग्य दिशेने वापरली गेली, तर ती व्यक्ती स्वतःसाठी आणि समाजासाठी प्रेरणा ठरू शकते. समाजाला अशा शक्तिशाली लोकांची गरज आहे जे मोठं काम करून इतिहास निर्माण करतील. प्रत्येक वेदना सहन करूनही पुन्हा उभं राहण्याची ताकद काही लोकांमध्ये असते – आणि तेच लोक पुढे जाऊन समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. जीवन म्हणजे अनंत शक्यतांचा प्रवास आहे. प्रत्येक अंधारामध्येही एक नवीन दिशा आणि नवीन आशा दडलेली असते. फक्त माणसाने जीवन कसे कार्य करते, भावना कशा कार्य करतात आणि निर्णय जीवनाला कसे बदलतात हे समजून घेण्याची गरज असते. जीवन हे एक व्यवस्थापन आहे – विचारांचे, भावनांचे, वेळेचे आणि प्रतिक्रियांचे. जेव्हा माणूस हे समजून घेतो, तेव्हा तो स्वतःला संपवत नाही तर आपल्या आव्हानांना हरवायला शिकतो. योग्य जीवन व्यवस्थापन माणसाच्या आतली शक्ती पुन्हा जागृत करू शकते. योग्य व्यवस्थापन माणसाला नव्या उपायांची आणि नव्या दृष्टीची दिशा देते. ते विचारशक्ती संपवत नाही तर आव्हानांवर मात करते. प्रत्येक रात्रीनंतर दिवस उगवतो आणि प्रत्येक अंधारामध्येही एक नवीन शक्यता जिवंत असते. जीवन म्हणजे त्या दोन्हींचे व्यवस्थापन शिकण्याचा प्रवास. माणसाला फक्त जगवण्याची नाही, तर त्याच्या आत पुन्हा आशा जागवण्याची गरज आहे. New Sight म्हणजे जीवन संपण्यापूर्वी आशा पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न. आज समाजाला केवळ सल्ल्याची नाही, तर भावनिक समज, ऐकून घेणारी मानसिकता आणि आशा निर्माण करणार्या जागरूक मानव विकास प्रणालीची गरज आहे.
आज जगभरात मानसिक तणाव, नैराश्य, भावनिक असंतुलन आणि एकटेपणाची भावना वेगाने वाढताना दिसत आहे. बाह्य प्रगती होत असली तरी अनेक व्यक्ती आतून तुटत चालल्या आहेत. विशेषतः तरुणांमध्ये वाढती निराशा, अपयशाची भीती, भावनिक दबाव आणि दिशाहीनता ही गंभीर सामाजिक समस्या बनत आहे. आणि Train For Life Initiative यांच्या माध्यमातून भावनिक जागरूकता, मानसिक संतुलन, जीवन व्यवस्थापन आणि मानवी प्रतिसाद विकासावर कार्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
लोकांच्या जीवनातील भावनिक प्रश्न समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन देणे, जीवनाचा योग्य हिशोब समजावून सांगणे, योग्य व्यवस्थापन आणि योग्य निर्णय घेण्याची मानसिक तयारी निर्माण करणे – हेच या उपक्रमाचे मुख्य
उद्दिष्ट आहे.
Suicide – first of the thoughts, then of the body
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…