उपनगर पोलिसांनी आवळल्या सहा जणांच्या मुसक्या
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करत सराईत गुन्हेगारासह सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दोन गावठी कट्टे, 10 ग्रॅम एमडी अमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाइल फोन आणि मोटारसायकल असा तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेत ट्रकचालकाला लुटणारा आरोपी आणि नशेसाठी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे संशयित आरोपीही ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली.
उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी सूरज गवळी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर दुर्गामाता मंदिर, जुना सायखेडा रोड परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शकांखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन, गौरव गवळी, प्रशांत देवरे, पंकज कर्पे यांनी सापळा रचला. पथकाने सौरभ दिगंबर महाले (वय 27, रा. धात्रक फाटा, नाशिक) व कौस्तुभ धनंजय इखनकर (वय 24, रा. दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे, नाशिकरोड) या दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले.
त्यांच्या अंगझडतीतून 5 ग्रॅम एम.डी., रोख 9 हजार रुपये, मोटारसायकल आणि मोबाइल असा एकूण 1.18 लाखांचा मुद्देमाल मिळून आला.
त्यांच्या चौकशीतून मुख्य पुरवठादार इशाद चौधरी या सराईत गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले. जयभवानी रोड परिसरात राहणार्या या सराईत गुन्हेगाराकडून 5 ग्रॅम एम.डी. आणि दोन गावठी कट्टे असा 56 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्यावर तब्बल पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत उपनगर पोलिसांनी दहा ग्रॅम एमडी मोबाइल मोटारसायकल व दोन गावठी कट्टे असा एकूण 1,74,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे आणि सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरात कुठेही अमली पदार्थाची विक्री किंवा सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. माहिती देणार्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल.
जबरी चोरी करणार्यास अटक
दरम्यान, पेट्रोल संपल्याचे कारण सांगून थांबवून बाहेरील राज्यातील ट्रकचालक संतोषकुमार बसियाल यांना संशयितांनी चाकूचा धाक दाखवून दोन हजार रुपये रोख व पाच हजार रुपये क्यूआर कोडद्वारे जबरदस्तीने वसूल केले होते. तपास अधिकारी पोउनि शशिकांत पवार यांच्या पथकाने अजीम मुश्ताक शेख (20, वडाळा), अर्कम आशपाक पिंजारी (24, वडाळागाव) आणि एका विधिसंघर्षित बालकाला जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून मोटारसायकल, मोबाइल फोन व स्टीलचा चाकू असा 15 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ट्रकचालकाला लुटणारा गजाआड
21 ऑगस्ट रोजी वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील ट्रकचालक कृष्णाअवतार राजभर यांना गोदावरी नदीकाठी थांबवून चाकूचा धाक दाखवत मोबाइल फोन लुटण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, सूरज गवळी, गौरव गवळी, प्रशांत देवरे, संदेश राघतवान यांच्या पथकाने संशयित कार्तिक गोरे (26, श्रमिकनगर) याला अटक केली. त्याने आपला साथीदार करण धोत्रे, गणेश डोंगरे, अविनाश धोत्रे व मनोज धोत्रे यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. फरार साथीदारांचा शोध सुरू असून, अटक आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
झाले आहे.
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…