महाराष्ट्र

73 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा

अग्रिम मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई :
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 73 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत जमा झाली आहे. राहिलेल्या उर्वरित शेतकर्‍यांच्या खात्यात आज आणि उद्या ही रक्कम जमा केली जाईल. आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत आहे. सणापूर्वीच मदतीचा हात मिळाल्यामुळे शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार आहे. यासोबतच सर्व मंत्र्यांनी यंदाची दिवाळी दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसोबत साजरी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी शेतकर्‍यांना अग्रिम रक्कम म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. दिवाळीपूर्वीच ही रक्कम देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानुसार या रकमेचे वितरणही सुरू झाले होते.
त्यानंतर उरलेले पैसे जमा करण्याबाबत बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत निर्देश दिले जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावले उचलत उर्वरित सर्व पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये तत्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आज आणि उद्या ही रक्कम थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात बळीराजाला दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने नुकताच राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या सर्व भागांतील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 40 हजार कोटींंच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. आता केंद्र सरकार राज्याला किती कोटींचे पॅकेज मंजूर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Money deposited into the accounts of 7.3 million farmers

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्क्रीन, स्ट्रेस आणि सोशल मीडिया

जनरेशन झेड (Gen Z) च्या मानसिक आरोग्याची आव्हाने आणि उपाय हातात अत्याधुनिक स्मार्टफोन, डोळ्यांवर चकाकणारा…

5 hours ago

गोपालनाचे आणि गोरक्षणाचे महत्त्व सांगणारी ‘वसूबारस’

दीपावलीतील पाहिला सण ’वसूबारस’. आश्विन कृष्ण द्वादशीस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची…

5 hours ago

आली दिवाळी…

भारतीय संस्कृती आणि परंपरेतील दिवाळी हा सर्वार्ंत मोठा सण असून, हिंदूंच्या या सणाचे विविध धर्मांच्या…

5 hours ago

स्त्रीचे खरे सौंदर्य स्वावलंबनात आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात

हेमांगी पाटील : दै. गांवकरी नवरंगोत्सवाच्या विजेत्या महिलांचा गौरव नाशिक : प्रतिनिधी स्त्रीचे खरे सौंदर्य…

6 hours ago

भाजपचे स्वीकृतसाठी धक्कातंत्र; शिंदेसेनेचे नाशिकरोडला झुकते माप

नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांत एक-एक वर्षाचे रोटेशन भाजपकडून संदीप लेनकर, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी…

6 hours ago

नाशिककरांचा खरेदीचा उत्साह अन् वाहतूक कोंडीचा मनस्ताप

मुख्य बाजारपेठांसह उपनगरांत वाहतूक कोंडीचा विळखा नाशिक : प्रतिनिधी प्रकाशपर्व अर्थात, दिवाळी सणाला आजपासून (दि.…

6 hours ago