संपादकीय

नार-पार प्रकल्प : प्रारंभ होणे-वाद न होणे गरजेचे

नार-पारबाबत काही शंका उपस्थित करणारा अशोक थोरात यांचा दैनिक गांवकरीमधील लेख (दि. 17 मार्च 2026) वाचला. नार-पारबाबत लेखातून दिखाऊ स्वरूपाचे असलेले काळजीचे जे दोन शब्द आलेत तेपण वाचले. सिंचनाअभावी सबंध उत्तर, पश्चिम महाराष्ट्रात जी धूळधाण उडाली आणि उडते आहे, त्या दुष्काळ-अवर्षणपीडित शेतकर्‍यांच्या दुःख व वेदनांवर थोडीफारही फुंकर मारली गेलीच तर त्याचे स्वागतच म्हटले पाहिजे. पण लेखाचे वाचन करताना कुठेतरी ‘आमचे काय?’ या मनोवृत्तीतून प्रांतीय भेदाचे बीजारोपण करणारीच ही ‘शंका’ आहे की काय? असे वाटते. त्यामुळे लेखकाने प्रथमदर्शनी दाखविलेला हा दिखाऊ कळवळा मर्यादित हिताचे संकुचित प्रदर्शन घडवणारा ठरतो. सर्वांत चीड आणणारी बाब ही की, या प्रकल्पाशी काडीमात्र संबंध राहिलेला नाही त्यांच्या गळ्यात विजयाच्या माळा घालताना लेखकाने कोणताही संकोच बाळगण्याचे औचित्य दाखविलेले नाही.

हे सारे जमवून आणले ते प्रशांतदादा हिरे परिवाराने. म्हणून चुकीचा व खोटा इतिहास समोर
मांडण्याचे संकुचित उद्योग का केले जावेत? शासनाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंजुरीचे श्रेय देणे यात
वावगे ते काही नाही. प्रकल्पाच्या व्यापक हिताकडे बघून एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खरा व वस्तुनिष्ठ इतिहास
विसरला जाऊ नये.

सबंध नाशिक जिल्हा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हे जाणून आहे की, नार-पार, सापुतारा, दमणगंगा नदीजोड प्रकल्पासाठी प्रतिष्ठा पणाला लावून मागणी करणारे कोण आहेत? या प्रकल्पाचा प्रवास थोडाथाडका नव्हे, तर गेली चार दशके खाचखळग्यांतून सुरू आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावाला ज्यांनी जन्माला घातले, त्यांनी या योजनेचे लाभ गुणोत्तरावर अभ्यासपूर्ण विचारमंथन वारंवार घडवून आणले. शरद पवारांसह संबंधित मंत्री, जलतज्ज्ञ आणि अधिकार्‍यांना एका व्यासपीठावर आणले. तेव्हाच तज्ज्ञ अधिकार्‍यांनी निक्षून सांगितले होते की, आता जर खरोखरच उत्तर, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्याचा दुष्काळ हटवायचा असेल, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील आणि दुष्काळपीडित शेतकर्‍यांच्या ताटात सुखाचे दोन घास पाहायचे असतील, तर पश्चिमवाहिनी नदीचे पाणी पूर्वेकडे वळविण्याशिवाय पर्याय नाही. किंबहुना हाच अंतिम पर्याय आहे. दुसरा कुठलाही मार्ग नाही. असे असूनही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मार्गात फक्त काटेच पसरविण्यात आले. या प्रकल्पाला मृगजळ ठरवले गेले.
मला आठवते, किमान चार ते पाच वेळा नार-पारचा केंद्रबिंदू असलेल्या मालेगावात पाणी परिषदा, मेळावे, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे व मनोहर जोशी यांच्या सभेत झालेल्या घोषणा हे सारे जमवून आणले ते प्रशांतदादा हिरे परिवाराने. म्हणून चुकीचा व खोटा इतिहास समोर मांडण्याचे संकुचित उद्योग का केले जावेत? शासनाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंजुरीचे श्रेय देणे यात वावगे ते काही नाही. प्रकल्पाच्या व्यापक हिताकडे बघून एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खरा व वस्तुनिष्ठ इतिहास विसरला जाऊ नये आणि त्याचा अद्याप सुरूही न झालेला प्रवास अनाहूत मुद्दे उपस्थित करून बाधित करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.
ज्या पाण्यावर कोट्यवधी लोकांचे, शेतकरी, कष्टकर्‍यांचे जीवन अवलंबून आहे, त्या प्रकल्पासाठी झटणार्‍यांना योग्य वेळीच बळ पुरवले गेले असते, शासनाकडे सामूहिक दांडगे प्रयत्न केले असते, तर या प्रकल्पाने आजस्थितीत खूप मोठी मजल मारल्याचे आपणास पाहावयास मिळाले असते. पण त्यावेळी ही सगळी मंडळी मूग गिळून गप्प बसली होती. राजा हरिश्चंद्रांच्या थाटात मुक्तहस्ते श्रेय बहाल करणारे हे तथाकथित काळजीवाहक आज शंका उपस्थित करून अवघ्या समाजाची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. ज्यांची नावे थोरात यांनी उद्धृत केली, त्या लोकांचा प्रस्तुत प्रकल्पाच्या प्रगतीत काडीमात्र सहभाग वा वाटा नाही, पण आपला सीमित स्वार्थ वा ईप्सित साध्य करण्यासाठी खोटी माहिती प्रस्तुत करणे आणि ज्यांच्या कारवायांमुळे नार-पारची प्रगती रोखून धरली गेली त्यांचाच उदो-उदो करणे, हे अनुचितच नव्हे.
तृषार्ताची तहान भागवणे आणि शेतकर्‍याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने नार-पार, दमणगंगा प्रकल्पाची गरज पुढे आली. केवळ श्रेयासाठी, राजकारणासाठी नाही. आधी बोटे मोडायची, प्रकल्पाला खोटे ठरवायचे, पश्चिमवाहिनी नद्यांत कुठले पाणीच नाही, अशी जाहीर हाकाटी पिटायची आणि नंतर मात्र सर्व सूत्रे बळजबरीने एकवटून घ्यायची वा पळवायची, हा झाला राजकारणाचा भाग. यात कुठले आले लोककल्याण? स्वतःला पत्रकारितेच्या संज्ञेत समाविष्ट केलेल्या थोरात यांनी आधी यातील राजकारण समजून घ्यावे व त्याअनुषंगाने जे खरे व वास्तव चित्र आहे ते त्यातील दाहकतेसह जनतेसमोर मांडण्याचे धारिष्ट्य दाखवावे आणि संकुचित विचारप्रदर्शन करणे टाळावे, हाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा
सन्मान ठरेल.

Nar-Par Project: Start-up – No need for controversy

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

11 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

11 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

11 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

11 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

11 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

11 hours ago