format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 13107200;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 135.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 36;
मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत
नाशिक : प्रतिनिधी
चैत्र शुद्ध प्रतिपदेचा मुहूर्त साधत नाशिक शहरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराघरांत गुढ्या उभारून पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला. नववर्षाच्या प्रारंभी नवे संकल्प करत प्रगतीकडे वाटचाल करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पहाटेपासूनच शहरात उत्सवी वातावरण पाहायला मिळाले. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत रांगोळ्या काढून गुढीची पूजा केली, तर पुरुषांनीदेखील पारंपरिक पेहरावात सहभाग घेतला. शालिवाहन संवत्सराच्या प्रारंभदिवसानिमित्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणार्या या दिवशी नागरिकांनी विविध शुभकार्यांना सुरुवात केली.
शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत
गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या नागरिकांच्या सहभागामुळे वातावरण दणाणून गेले. गोदावरी नदीकाठावरही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावत नववर्षाचे स्वागत केले.
श्रीखंड-पुरीचा आस्वाद; बाजारपेठेत गर्दी
गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळाली. श्रीखंड-पुरी हा पारंपरिक नैवेद्य असल्याने श्रीखंड आणि दुधाची मागणी लक्षणीय वाढली होती. मिठाई दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची रांग लागलेली दिसून आली.
खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद
शुभ मुहूर्त साधत अनेक नागरिकांनी नवीन वाहन, घरगुती वस्तू तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी केली. वाहन विक्री केंद्रे आणि ज्वेलरी दुकानांमध्येही ग्राहकांची मोठी गर्दी होती. व्यापारीवर्गासाठीही हा दिवस उत्साहवर्धक ठरला. एकूणच, पारंपरिक उत्साह, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खरेदीच्या जल्लोषात नाशिककरांनी मराठी नववर्षाचे आनंदाने स्वागत केले.
Gudi Padwa celebrated with enthusiasm
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…