महाराष्ट्र

नाशिक सीबीएसचेही होणार नूतनीकरण

नाशिक सीबीएसचेही होणार नूतनीकरण
पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून 10 कोटी रुपयांचा निधी*

नाशिक : प्रतिनिधी

आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे कामे शासनस्तरावर पाठपुरावा करून पूर्णत्वास नेण्याचे काम आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून अविरत सुरू आहे. नाशिक येथील सीबीएस हेदेखील नाशिक शहरातील बहुप्रतीक्षित काम होते. गेले अनेक वर्षांपासून नाशिक सीबीएस निधीच्या प्रतीक्षेत होते. आमदार देवयानी फरांदे यांनी सदर बाबीकडे लक्ष देऊन सीबीएस बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे.
सीबीएस येथील जुनी इमारत पाडून नवीन इमारत व आगार उभी राहणार आहे यासाठी दोन मजली इमारत उभी राहणार असून तळमजल्यावर ९५० चौरस मीटरचे काम होणार आहे तर पहिल्या मजल्यावर ५९० चौरस मीटरचे काम होणार आहे. नवीन इमारत व आगारासाठी सांडपाण्याची व्यवस्थादेखील नव्याने करण्यात येणार आहे. सीबीएस परिसरातील ४४०० चौरस मीटर क्षेत्राचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून पेपर ब्लॉकदेखील लावण्यात येणार आहे. फायर फायटिंगमध्ये व रेन हार्वेस्टिंग यासारख्या अत्याधुनिक सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. मेळा बसस्थानकाची सुंदर इमारत उभी राहिल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी सीबीएसचे काम हाती घेतल्यामुळे आता येथे देखील सुंदर इमारत उभी राहील. या कामाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येऊन कामास सुरुवात करण्यात येणार आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

14 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

14 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

14 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

14 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

14 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

15 hours ago