नाशिक

कालिकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा आध्यात्मिक वातावरणात प्रारंभ

भक्तिभावाने आदिमाया, आदिशक्ती देवीची मनोभावे पूजा

नाशिक, सिडको : प्रतिनिधी
नाशिकचे ग्रामदैवत आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री कालिकादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणात शुभारंभ झाला. पहाटे पाच वाजता मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. या मंगलप्रसंगी देवीच्या सान्निध्यात धार्मिक मंत्रोच्चार, शंखध्वनी आणि पूजाविधीने मंदिर परिसर भक्तिमय झाला.
यानंतर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते श्री कालिकेच्या मूर्तीवर पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला. जिल्हाधिकारी जलज शर्मा व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते महाआरती करण्यात
आली.
सकाळी झालेल्या या भक्तिपूर्ण कार्यक्रमात ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्याच्या निनादात नवरात्र महोत्सवाचे ध्वजारोहण करण्यात आले. परिसरात निर्माण झालेल्या भक्तिरसात न्हालेल्या वातावरणाने भाविकांना एक अलौकिक आध्यात्मिक अनुभव दिला. महिलांच्या भजनी मंडळांनी पारंपरिक अभंग, भक्तिगीते सादर करत देवीच्या चरणी भक्तीचा सागर अर्पण केला.
यावेळी कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव (अण्णा) पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, किशोर कोठावळे, संतोष कोठावळे, दत्ता पाटील, सुरेंद्र कोठावळे, विशाल पवार, योगेश पवार, भय्यासाहेब कोठावळे, दीपक तळाजिया, राम पाटील, भरत पाटील, योगेश कोठावळे सतीश कोठावळे, प्रकाश पाटील, श्याम पाटील, दीपिका पाटील, कांचन पाटील, लता पाटील यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते.

पहाटेपासूनच दर्शनासाठी हजारो भाविकांनी रांगा लावल्या होत्या. देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसरात भक्तिभावाची ऊर्जा निर्माण झाली होती.हा नवरात्रोत्सव केवळ धार्मिक परंपरेचा उत्सव नसून, तो गावाच्या आध्यात्मिक एकतेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि भक्तिसंपन्न परंपरेचा साज आहे. पुढील नऊ दिवस देवीची विविध स्वरूपातील उपासना, आरत्या, प्रवचने, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी श्रद्धा आणि भक्तिभावाने या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

 

Editorial Team

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

31 minutes ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

39 minutes ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

44 minutes ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

51 minutes ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

58 minutes ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

1 hour ago