नाशिक

सफाई कर्मचार्‍यांना घरकुलाची संधी

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचा आढावा

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर नगरपरिषदेत कार्यरत 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कायमस्वरूपी सफाई कर्मचार्‍यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम सफल्य योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिले. पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे पाठविण्यासह कर्मचार्‍यांच्या प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवरही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
सिन्नर नगरपरिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी (दि.30) झालेल्या बैठकीत पात्र कर्मचार्‍यांची यादी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया तसेच लाभ मिळण्यात येणार्‍या अडचणींवर चर्चा करण्यात आली. घरकुल योजनेचा लाभ पात्र कर्मचार्‍यांपर्यंत वेळेत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीच्या प्रारंभी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले व मुख्याधिकारी अभिजित कदम, आरोग्य सभापती ललिता हांडे यांच्या हस्ते उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे स्वागत करण्यात आले. कार्यालयीन अधीक्षक कैलास चव्हाण, कर निर्धारण अधिकारी अमित काकुळते यांनी आस्थापना विभागाची माहिती दिली, तर मनोहर बोरसे यांनी स्वच्छता विभागाच्या कामकाजाचा आढावा सादर केला. बैठकीस आरोग्य सभापती ललिता हांडे, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच कायमस्वरूपी सफाई कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सफाई कर्मचार्‍यांना मिळणार्‍या शासकीय सुविधा, सेवाविषयक अडचणी, कामाच्या ठिकाणच्या मूलभूत सुविधा, सुरक्षितता उपाययोजना, आरोग्यविषयक बाबी आणि इतर मागण्यांवर चर्चा झाली. उपाध्यक्ष सारवान यांनी कर्मचार्‍यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले.
सफाई कर्मचार्‍यांचे कार्य शहराच्या स्वच्छतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कर्मचार्‍यापर्यंत पोहोचविणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सारवान यांनी नमूद केले.
मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती देत सफाई कर्मचार्‍यांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Opportunity for sanitation workers to own homes

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

20 seconds ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago