नाशिक

दिव्यांग महिलेच्या मदतीला धावले प्रशासन

जनता दरबारातील तक्रारीची तातडीने दखल

सिन्नर : भरत घोटेकर
जनता दरबारात उपस्थित झालेल्या दोडी बुद्रुक येथील 100 टक्के दिव्यांग असलेल्या स्वाती राजाराम इघे या महिलेच्या घरकुलाच्या प्रश्नाची पंचायत समिती प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे.
सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी गुरुवारी (दि.30) स्वाती इघे यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि जागेसह घरकुलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकार्‍यांकडे पाठवत कार्यतत्परता दाखवून दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असलेल्या स्वाती इघे यांना आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनेतून घरकुलाचा लाभ मिळालेला नव्हता. त्यातच घरकुल मंजूर झाले तरी बांधकामासाठी दोडी बुद्रुक येथे त्यांच्याकडे स्वतःची जागा उपलब्ध नसल्याची बाबही समोर आली. रविवारी सिन्नर शहरातील ज्वालामाता लॉन्स येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या जनता दरबारात स्वाती इघे यांनी घरकुलाचा प्रश्न मांडला होता. त्यावेळी आमदार कोकाटे यांनी समाजकल्याण विभागांतर्गत तातडीने घरकुलाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना दिल्या होत्या. त्या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करत भवारी यांनी संबंधित महिलेची प्रत्यक्ष भेट घेऊन तिच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच स्थानिक ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा विशेष बाब म्हणून घरकुलासाठी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय समाजकल्याण विभागाच्या 5 टक्के दिव्यांग आरक्षणातून घरकुल मंजुरीसाठी जागेसह प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला. या तत्पर कार्यवाहीमुळे प्रशासनाने केवळ शासकीय प्रक्रिया गतीमान केली नसून सामाजिक बांधिलकीही जपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Administration rushes to the aid of a differently-abled woman.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago