चार वर्षांनंतर मोठी इंधन दरवाढ; नाशिकमध्ये पेट्रोल 107.93 तर डिझेल 94.41 रुपये
नाशिक : प्रतिनिधी
तब्बल चार वर्षांनंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली असून त्याचा फटका नाशिककरांनाही बसला आहे. 15 मे 2026 पासून नाशिक शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 107.93 रुपये तर डिझेलचा दर 94.41 रुपये झाला आहे. कंपनी तसेच पेट्रोल पंपाच्या स्थानानुसार या दरात सुमारे 15 पैशांपर्यंत फरक असू शकतो.
यापूर्वी मे 2021 मध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग वाढ करण्यात आली होती. त्या काळात देशभरात इंधनाचे दर जवळपास दररोज वाढले होते. मे 2021 मध्ये पेट्रोलमध्ये ₹3.83 तर डिझेलमध्ये ₹4.42 प्रति लिटर वाढ झाली होती. मुंबईसह अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली होती.
सध्याची दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, मध्यपूर्वेतील तणाव आणि तेल कंपन्यांवरील वाढता आर्थिक भार यामुळे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याबरोबरच भाजीपाला, दूध व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…
View Comments
युद्ध, जागतिक राजकारण आणि आर्थिक संघर्ष यांची सर्वात मोठी किंमत शेवटी सामान्य नागरिकालाच चुकवावी लागते, हीच या परिस्थितीतील सर्वात वेदनादायक वस्तुस्थिती आहे.
पेट्रोल-डिझेल दरवाढ ही केवळ इंधन महागल्याची बातमी नसून ती सर्वसामान्यांच्या वाढत्या आर्थिक असुरक्षिततेची आणि महागाईच्या वाढत्या दडपणाची गंभीर जाणीव करून देणारी घटना आहे.