नाशिक

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्ताला दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ
नाशिक प्रतिनिधी
देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आद्य जोतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त पुरूषोत्तम मधुकर कडलग वय ४६ वर्ष यांना त्र्यंबक पोलीसांनी दर्शनाचा काळाबाजार करण्याच्या दाखल प्रकरणात अटक केली आहे. याबाबत सवीस्तर हकीगत या प्रमाणे आहे. शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी नाशिक पंचवटी येथील एका भाविकाने दर्शनासाठी ३ हजार रूपये घेऊन मंदिरात प्रवेश दिला मात्र ३ हजार रूपयांची पावती दिली नाही म्हणून त्र्यंबक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. भाविक २०० रूपये पास घेऊन रांगेत उभे असतांना त्यांना या रांगेत ४ तास वेळ लागेल म्हणून घाबरवण्यात आले. तुमचे ३ हजार रूपयात व्हि आय पी दर्शन करून देतो म्हणून संशयीत गोटीराम मनाजी पेहरे राहणार खडकवाडी त्र्यंबकेश्वर आणि अभिषेक कडलग राहणार त्र्यंबकेश्वर यांनी दर्शनासाठी थेट प्रवेश मिळवून दिला व ३ हजार रूपये घेतले मात्र त्याची पावती दिली नाही. त्र्यंबकेश्वर मंदिरात अशा प्रकारे ३ हजार रूपये व्हिआयपी पासची व्यवस्था नाही म्हणून ठकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये गोटीराम मनाजी पेहरे यास अटक झाली आहे तर दुसरा संशयीत आरोपी अभिषेक कडलग फरार आहे. फसवणुक झालेल्या भाविकाने अभिषेक कडलग हा ट्रस्टींचा नातेवाईक आहे व म्हणून त्याने मंदिरात थेट प्रवेश मिळवून दिला असे नमुद केले होते. त्र्यंबक पोलीसांनी फरार अभिषेक कडलग याचा शोध घेतांना व तांत्रीक मुद्यांच्या आधारे झालेल्या फसवणुकीचा तपास करत असतांना विश्वस्त पुरूषोत्तम कडलग यांच्या पर्यंत दर्शनाच्या काळाजाराचे धागेदोरे जोडले जात असल्याचे निष्पन्न झाल्याने सोमवारी रात्री उशीरा मंगळवारच्या पहाटे पुरूषोत्तम कडलगला अटक करण्यात आली आहे. मागच्या काही महिन्यांपासून त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान दर्शनाच्या काळाबाजार होत असल्याची सातत्याने चर्चा होत आहे. त्यात मागच्या आठवडयात एका महिलेची फसवणुक झाल्याचा व्हीडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला. त्यापुर्वी एका भाविकाला झालेल्या मारहाणीची चौकशी सुरू होती. सातत्याने तकारी होत असल्याने प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी पोलीसांना सुचना केल्या होत्या. प्रत्यक्ष विश्वस्त यात सहभागी असल्याच्या चर्चा होती. त्यामुळे अशा प्रकारच्या दर्शनाच्या नावाने पैसे उकळणा-यांना पायबंद घालणे अवघड झाले होते. त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्राची प्रतिमा मलीन झाली होती. आता पुरूषोत्तम कडलग यांना अटक झाल्याने संपुर्ण साखळी ताब्यात येऊ शकते. पोलीस आता दर्शनाच्या काळाबाजाराच्या बाबत सखोल तपास करत आहेत. या साखळीत समावेश असलेल्या घटकांची तपासणी होत आहे. यामध्ये आणखी काही संशयीतांना ताब्यात घेण्यात येईल असे संकेत मिळत आहेत .

Police arrest Trimbakeshwar temple trustee in black market darshan case

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

4 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

4 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago