नाशिक : प्रतिनिधी
गरिबांचा गळा दाबवणारे, गरिबांचा हक्क हिरवणारे लोक कितीही मोठे असले, तरी त्यांना सोडणार नाही, असा सज्जड इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यावर नाशिकच्या म्हाडा कोट्यातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय अधिकार्यांचा सहभाग असलेल्या विशेष चौकशी समितीची (एसआयटी) स्थापना केल्याचे जाहीर केले. त्याबाबतचा शासन निर्णयही जारी केला.
बहुचर्चित म्हाडा घोटाळ्याचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करून एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या धोरणानुसार गृहनिर्माण योजनेंतर्गत पालिका क्षेत्रातील चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या गृहप्रकल्पात 20 टक्के सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, या निकषाला बगल देत शहरातील 49 बिल्डरांनी या जमिनींचे प्रत्यक्षात विभाजन आणि नियमानुसार मोजणी झालेली नसताना जागामालक व विकासकांनी भूमी अभिलेख कार्यालयाची बनावट स्वाक्षरी, शिक्के, नकाशे, आकारफोड पत्रक खरी असल्याचे भासवत उपरोक्त क्षेत्राचे तुकडे करून म्हाडा, महसूल व भूमी अभिलेख विभागासह शासनाची फसवणूक केल्याचा संशय आहे. संशयितांनी केलेल्या धुळफेकीमुळे म्हाडाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्प्प्न गटासाठी किमान चार हजार ते कमाल साडेसहा हजार सदनिका मिळू शकलेल्या
नाही.
दरम्यान, चौकशीअंती राखीव गटासाठी 20 टक्के सदनिका उपलब्ध करून न दिल्याचे समोर आल्यास सदरचे क्षेत्र वसूल करण्याबाबत कार्यवाही करावी, तसेच दोषी अधिकारी, कर्मचार्यांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाविषयक कार्यवाहीची शिफारस करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहे.
समितीच्या तपासाचे मुख्य मुद्दे
4000 चौ.मी.पेक्षा मोठे प्रकल्प : 8 नोव्हेंबर 2013 च्या अधिसूचनेनुसार, 4000 चौ.मी.पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या ज्या ले-आऊटमध्ये 20% भूखंड किंवा सदनिका म्हाडाला उपलब्ध करून दिल्या नाहीत, अशा प्रकरणांची चौकशी करणे.
क्षेत्र वसुली : ज्या ठिकाणी आरक्षण दिले गेले नाही, ते क्षेत्र प्रचलित नियमांनुसार शासनाकडे वसूल करणे.
अशी आहे उच्चस्तरीय समिती ः
विभागीय आयुक्त नाशिक -अध्यक्ष
जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख- सदस्य
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक – सदस्य
पोलीस आयुक्त नाशिक- सदस्य
संचालक नगररचना व नियोजन- सदस्य
उपसंचालक भूमी अभिलेख – सदस्य गुन्हे
SIT formed to investigate Nashik’s MHADA reservation
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…