मुंबई : प्रतिनिधी
ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची मोठी झळ बसत आहे. गृहिणींचे बजेट पार कोलमडून गेले आहे. खाद्यतेल आणि भाज्यांच्या वाढत्या दरांपाठोपाठ आता डाळींच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. देशातील बाजारपेठांमध्ये हरभरा (चना), मूग, तूर (अरहर), उडीद आणि मसूर यांसारख्या रोजच्या वापरातील महत्त्वाच्या डाळींचे दर गगनाला भिडले आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
बाजारपेठेतील ताज्या आकडेवारीनुसार, डाळींच्या किरकोळ दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी 113.66 रुपये प्रतिकिलो असणारा तूर डाळीचा राष्ट्रीय सरासरी किरकोळ दर आता थेट 124.23 रुपये प्रतिकिलोच्या घरात पोहोचला आहे. यासोबतच मसूर आणि उडीद डाळीतही मोठी तेजी पाहायला मिळत आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आगामी काळात मसूरच्या दरात क्विंटलमागे सुमारे एक हजार रुपयांची तर तूरडाळीत आणखी तीनशे रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हरभरा आणि मूगडाळीचे भावही सातत्याने चढेच असल्याने बाजारात डाळींच्या किमतींनी अक्षरशः शिखर चढायला सुरुवात केली आहे.
Pulse prices also increased.
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…