नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची व अत्यावश्यक कामे स्मार्ट सिटीमार्फत केली जाणार होती. यासाठी शनिवार व रविवारी (दि.22) दोन दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार होता. परंतु, सदर कामासाठीचे साहित्य उपलब्ध न झाल्याने प्रस्तावित शटडाउन मागे घेण्यात आल्याची माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
दरम्यान, दोन दिवस शटडाउन घेण्याचे नियोजित करण्यात आलेले होते. त्यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत सर्व सहा विभागांकडून व स्मार्ट सिटीमार्फत करावयाच्या कामांची यादी निश्चित करण्यात आली होती. तथापि गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रापावेतो नव्याने टाकण्यात आलेल्या 900 मी.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याच्या हेतूने अस्तित्वातील जलवाहिनीवर गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे 1200 मि.मी. व्यासाच्या पाइपलाइनवर क्रॉस कनेक्शन करणे हे काम केले जाणार होते. तसेच नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटर फाऊंटनकडे जाणार्या लाइनवर क्रॉस कनेक्शन करणे त्याचप्रमाणे इतर आवश्यक व अन्य मोठ्या स्वरूपाच्या कामांसाठी आवश्यक साहित्य जागेवर विहित उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे नियोजित शनिवार व रविवारचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला आहे. या कामाचे फेरनियोजन लवकरच करून त्याबाबतची माहिती नागरिकांना दिली जाणार असल्याचे मनपाने म्हटले आहे.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik