मेनरोडवरील गंगास्लॅब तोडल्याने रथयात्रेच्या मार्गाबाबत संभ्रम
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथील मेनरोडवरील गोदावरी नदीपात्रावरील सिमेंट काँक्रीटचा स्लॅब तोडण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, पुढील दोन-चार दिवसांत नदीपात्र पूर्णपणे खुले होण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या मंगळवारी (दि. 24) कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा आहे. यानिमित्ताने गेल्या 168 वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेला ऐतिहासिक रथोत्सव यंदा साजरा होणार का? असा प्रश्न त्र्यंबकवासीय व भाविकांना पडला आहे.
त्र्यंबकेश्वर संस्थानच्या 31 फूट उंचीच्या भव्य रथात भगवान त्र्यंबकराजांचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवून पाच बैलजोड्यांच्या सहाय्याने मंदिरापासून कुशावर्त घाटापर्यंत मिरवणूक काढली जाते. गंगास्लॅबच्या दोन्ही बाजूंनी असलेला मेनरोड हा पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो. प्रत्येक सोमवारी येथून पालखी निघते, तर त्रिपुरारी पौर्णिमेला उजव्या बाजूच्या रस्त्याने रथ मिरवणूक मार्गस्थ होते. मंगलवाद्ये, चांदीचा मुखवटा असलेली पालखी आणि सुवर्ण मुखवट्यासह निघणार्या या सोहळ्यात स्थानिकांसह बाहेरगावचे भाविक मोठ्या संख्येने
सहभागी होतात.
पूर्वी रथ मिरवणुकीच्या वेळी भाविक या गंगास्लॅबवर उभे राहून दर्शन घेत असत. मात्र, यंदा हा स्लॅब तोडल्याने मेनरोडच्या उजव्या बाजूकडील चिंचोळ्या रस्त्यातून हा भव्य रथ कसा मार्गक्रमण करणार, याबाबत नागरिक साशंक आहेत. यासंदर्भात देवस्थान ट्रस्टने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर न केल्याने बाहेरगावच्या भाविकांचे चौकशीसाठी सतत फोन येत
आहेत.
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या रथोत्सवासाठी अनेक भाविक नवसपूर्ती व दर्शनासाठी येतात. यासाठी अनेकांनी विमान, रेल्वे, बस तसेच निवास आणि दर्शन पासचे आगाऊ आरक्षण केले आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रथोत्सव होणार की नाही, याचा खुलासा देवस्थान ट्रस्टने तातडीने करावा, अशी मागणी जोर धरत आहे. त्रिपुरारी पौर्णिमा व देवदिवाळीने दीपोत्सवाची सांगता होते. या दिवशी त्र्यंबकेश्वर परिसरात भाऊबीजेप्रमाणे बहिणी आपल्या भावांना ओवाळतात.
Residents of Trimbak look forward to the centenary-plus chariot festival
- अश्विनी पांडे निसर्गाची मुक्त उधळण, आल्हाददायी हवामान, हिरवळ आणि तुलनेने शुद्ध हवा ही नाशिकची…
- गोरख काळे येत्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा सोपस्कार पार पडणार असून, महापौर हिमगौरी आहेर-आडके…
अन्यायाविरुद्ध पेटलेला स्वाभिमानाचा अग्निकुंड! - ग्रीष्मा नागमोती ज्या भूमीवर पिढ्यान्पिढ्या वास्तव्य केले, ज्या जंगलांनी जगण्याचा…
दुष्काळावर मात करणारा जलसंधारणाचा ’पेठ पॅटर्न’ - देवयानी सोनार यंदा पावसाची अवकृपा झाल्याने नाशिक जिल्ह्यातील…
सध्या एक्यूआय अर्थातच ’एअर क्लॉलिटी इंडेक्स’ आणि त्यावरील आकडेमोड मीडियातील सर्वांत महत्त्वाची बातमी बनवून राहिली…
आशिया खंडातील पश्चिम भागात असलेला इस्रायल हा एक छोटा देश आहे. पॅलेस्टाइनवरील ब्रिटिश राजवट संपुष्टात…