नाशिक

बोराडे आत्महत्या : सात संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

सिन्नर : प्रतिनिधी
खासगी सावकारांच्या सततच्या पैशांच्या तगाद्याला आणि मानसिक छळाला कंटाळून फटाके व्यावसायिक अतुल रामदास बोर्‍हाडे (34, रा. रामनगरी, सिन्नर) यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी सात संशयितांना शनिवारी (दि. 14) सायंकाळी अटक केली होती. रविवारी (दि. 15) या सातही संशयितांना सिन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे शहरातील अवैध सावकारीचे प्रकरण ऐरणीवर आले आहे.
अतुल बोर्‍हाडे यांनी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांच्या पत्नी प्रियांका बोर्‍हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 108, 352, 351(2), 329(3) तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 मधील कलम 39 व 45 अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तपास पथक तयार करून संशयितांचा शोध घेत शनिवारी सायंकाळी सात जणांना अटक केली.
यामध्ये सचिन संभाजी गिते (45, रा. कानडी मळा), सौरभ मनोज खेडलेकर (33, रा. कुंभार गल्ली), सचिन बाबूराव धनगर (36, रा. वैदूवाडी), हर्षल मिलिंद गोळेसर (24, रा. खळवाडी), मीरा अनिल खोपे (62, रा. विजयनगर), माधुरी सागर शिंदे (28, रा. नायगाव रोड) आणि उज्ज्वला रवींद्र लोखंडे (55, रा. नाशिकवेस) यांचा समावेश आहे. रविवारी या सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Borade suicide: Seven suspects remanded to two days’ police custody

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दिवे उजळले, पण श्वास कोंडला!

- अश्विनी पांडे निसर्गाची मुक्त उधळण, आल्हाददायी हवामान, हिरवळ आणि तुलनेने शुद्ध हवा ही नाशिकची…

16 hours ago

सभागृहातील सत्तेच्या विकेंद्रीकरणाला ‘ब्रेक’!

- गोरख काळे येत्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा सोपस्कार पार पडणार असून, महापौर हिमगौरी आहेर-आडके…

16 hours ago

‘धरती आबा’ बिरसा मुंडा

अन्यायाविरुद्ध पेटलेला स्वाभिमानाचा अग्निकुंड! - ग्रीष्मा नागमोती ज्या भूमीवर पिढ्यान्पिढ्या वास्तव्य केले, ज्या जंगलांनी जगण्याचा…

16 hours ago

संकटातून संधीकडे…

दुष्काळावर मात करणारा जलसंधारणाचा ’पेठ पॅटर्न’ - देवयानी सोनार यंदा पावसाची अवकृपा झाल्याने नाशिक जिल्ह्यातील…

16 hours ago

दिवाळीतील एक्यूआय समजून घेऊया…

सध्या एक्यूआय अर्थातच ’एअर क्लॉलिटी इंडेक्स’ आणि त्यावरील आकडेमोड मीडियातील सर्वांत महत्त्वाची बातमी बनवून राहिली…

16 hours ago

इस्रायली सत्तासंघर्ष

आशिया खंडातील पश्चिम भागात असलेला इस्रायल हा एक छोटा देश आहे. पॅलेस्टाइनवरील ब्रिटिश राजवट संपुष्टात…

16 hours ago