– जगन घाणेकर
वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात खूप काही मिळवायचे आहे, उंच भरारी घ्यायची आहे; पण तरीही अनेक जण मागे का पडतात? याचे मुख्य कारण म्हणजे आपली ऊर्जा आणि वेळ चुकीच्या ठिकाणी वाया जाणे. जर आपण हीच ऊर्जा साठवून योग्य दिशेने वापरली तर अशक्य गोष्टही शक्य करता येईल.
आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही वाईट सवयी आपली ताकद वाया घालवत असतात. प्रगती करायची असेल तर ऊर्जेची बचत करणे अत्यावश्यक आहे. बाहेरून आल्यावर गाडीची चावी ठराविक जागी न ठेवल्याने ती शोधण्यात जाणारा वेळ, फोनवर बोलताना संभाषण भरकटल्याने वाया गेलेली ऊर्जा आणि सोशल मीडियावरील न संपणारे स्क्रोलिंग या सर्व गोष्टी आपली ताकद हळूहळू शोषून घेतात.(ऊर्जा) नेमकी कशी वाचवायची, हे समजून घेण्यासाठी या इंग्रजी शब्दाचीच विभागणी करून पाहूया.
नकारात्मकता दूर करा :
नकारात्मकतेला जीवनातून हद्दपार करा. सतत तक्रारी करणार्या आणि प्रत्येक गोष्टीत वाईट शोधणार्या लोकांपासून दूर राहून नेहमी सकारात्मक व्यक्तींच्या सहवासात राहा.
वेळेचे भान आणि ‘नाही’ म्हणण्याची कला : वेळेचे अचूक नियोजन करा. तसेच, मित्रांच्या दबावाखाली किंवा इतरांना खूश करण्यासाठी नको असलेल्या गोष्टींना ‘नाही’ म्हणायला शिका.
वर्तमानात जगा : भूतकाळाचे ओझे न बाळगता वर्तमानाचा आनंद घ्या. स्वतःच्या चुका व बलस्थाने ओळखून स्वतःमध्ये सुधारणा करत राहा.
विश्रांती आणि नवी सुरुवात : सततच्या कामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. कामाच्या मध्ये थोडी विश्रांती घ्या. आराम झाला की पुन्हा नव्या दमाने आणि जोमाने कामाला लागा.
आत्मविकास : स्वतःच्या प्रगतीचा विचार करा. ज्या गोष्टींमुळे तुमच्या ज्ञानात आणि कौशल्यात भर पडेल, तीच वाट निवडा.
स्वतःला प्राधान्य द्या : इतरांना खूश करण्याच्या नादात स्वतःचे अस्तित्व गमावू नका. लोक आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणार नाहीत, याची काळजी घ्या आणि आधी स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्या. वेळेचे नियोजन आणि सकारात्मकता म्हणजेच यशाची खरी ऊर्जा! दुसरीकडे, आपल्याकडून नकळत होणारा (अपव्यय) कसा थांबवायचा?
एखाद्या गोष्टीचा राग आला की आरडाओरड करणे, आदळआपट करणे आपल्याकडून सहजच होत असते. हा राग विनाशकारी व आत्मघातकी ठरतो. रागाच्या भरात केलेले आकांडतांडव ही ताकद नसून, शांत राहणे ही खरी शक्ती आहे. ज्याचा कुणाचा राग आला असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचे तंत्र आत्मसात करून घ्यावे. रागाने स्वतःचेच रक्त जाळून घेण्यापेक्षा तो प्रसंग टाळणे कधीही चांगले. राग हा आपण स्वतःलाच दिलेला एक शाप ठरतो. आगपेटीची काडी जशी आधी स्वतः जळते आणि नंतर दुसर्याला जाळते, तसेच रागाचे असते. रागाच्या भरात आपली शक्ती गमावू नका. हा अपव्यय थांबवण्यासाठी या शब्दाचा अर्थ समजून घ्या.
व्यर्थ काळजी : उगाचच चिंता करत राहणे बंद करा. मनावर ताबा मिळवा. काळजी करण्याऐवजी स्वतःची काळजी घ्या.
व्यर्थ वादविवाद : घरातील किंवा जवळच्या व्यक्तींशी मतभेद असू शकतात, पण प्रत्येक मुद्द्यावर वाद घालत बसणे आपली मानसिक ऊर्जा वाया घालवते. मतभेदांपेक्षा नात्यांना महत्त्व द्या.
स्मार्टफोनचा अतिवापर : स्मार्टफोनवर रील्स पाहणे आणि सोशल मीडियाचा अनावश्यक वापर करण्यात आपला मोलाचा वेळ जातो. डिजिटल स्क्रीनपासून ठराविक वेळेत दूर राहणे
गरजेचे आहे.
अतिविचार : कोणतीही मर्यादा न ठेवता एकाच गोष्टीचा अतिविचार करणे मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. भूतकाळातील घटनांचा परिणाम वर्तमानावर होऊ देऊ
नका.
मत्सर/ईर्षा : दुसर्याची ईर्षा करणे किंवा मनात द्वेष बाळगणे आपल्याला आतून कमकुवत करते. इतरांशी तुलना करण्याऐवजी
स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. शांत राहणे हीच खरी शक्ती; रागाच्या भरात आपली ऊर्जा गमावू नका!
आजपासून नवीन सुरुवात करा. खालील तीन नियम अवश्य पाळा.
1. रोज फोनचा स्क्रोलिंग टाइम किमान 30 मिनिटांनी कमी करा.
2. चावी, पाकीट यांसारख्या वस्तू एकाच जागी ठेवण्याची
सवय लावा.
3. रोज 15 मिनिटे निसर्गाच्या सान्निध्यात किंवा स्वतःच्या आवडीसाठी द्या.
मानसिक ऊर्जेसोबत शारीरिक ऊर्जा जपण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप अत्यावश्यक आहे. आपण वरील गोष्टींचे काटेकोर पालन केले आणि वेळीच स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवले तर आपली ऊर्जा विनाकारण वाया जाणार नाही. हा वाचवलेला वेळ निसर्गाच्या सान्निध्यात, स्वतःच्या छंदांमध्ये आणि आत्मविकासामध्ये घालवा. आजच ठरवा-ऊर्जा वाया घालवायची की स्वतःचे भविष्य घडवायचे!
Saving energy is the key to success!
- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…
- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…
- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…
- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…
- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…