संपादकीय

मोबाईलमुळे भविष्य संकटात

– अशोक थोरात

देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत होत्या लँड लाईन फोन चार चार दिवस लागत नव्हते. सर्वात मोठी समस्या घरात कोणी वारले तर नातेवाईकांना निरोप देणे सर्वात अवघड होत होते. मग राञ पहाट थंडी वारा पाऊस काही असो सामान्य लोक सायकल वर गावागावात जात अर्ध्या राञी ते घर शोधतांना जिव जायची वेळ यायची. कसा तरी निरोप दिला पण काही नातेवाईक महत्वाचा निरोप आणला तरी साधे पाणी विचारत नव्हते चहा दुरच. दारातुनच निरोप ऐकायचे व दार जोरात लाऊन झोपायचे. त्या निरोपाचे कोणतेच गांभीर्य नव्हते. मग थोडी सुधारणा झाली दोन चार मोटर सायकल जमा करायच्या पेट्रोलला जेमतेम शक्यतो कमी पडेल असे पैसे द्यायचे व अशा वेळी गाडी अंधारात पंचर होतच असे रस्ते सुमार होते. हळुहळु प्रगती का अधोगती झाली पण पंधरा दिवसात येणारे खुषालीचे दुखःद घटनेचे पञ येणे बंद झाले व पाठवणे बंद झाले. टपाल येते फक्त सरकारी पण ते सुध्दा मेल ने येते. सर्व झटपट सुरू झाले पण मोबाईल नावाचा राक्षस ज्याचा चांगला उपयोग दहा विस टक्के करतात व बाकीचे दिवसभर खर्या खोट्या बातम्या गेम जुगार अश्लीश गोष्टी बघत असतात . अभ्यासाच्या नावाने बापा कडुन भांडुन मोबाईल पदरात पाडुन घ्यायचा व दरमहा चारशे रूपयाचा रिचार्ज गरीब असो श्रीमंत असो बापाला खर्च करावाच लागतो.
मोबाईलने प्रगती का अधोगती याचे उत्तर विस टक्के चांगला उपयोग करून घेणारे व ऐशी टक्के टाईमपास करून मनस्ताप करून घेणारे आहेत. तरूणाईचे तर तेहतिस कोटी देव मोबाईलच आहेत. सर्व चुकीचे संस्कार करणारा मोबाईल आहे. त्यात जे जे फालतुक दिसते त्याचे अनुकरण करून मग गायब होणे परस्पर लग्न करणे विरोध केला तर आई बापाचा खुन करणे कधी कधी एक दुजे के लिये दोघ झाडाला रेल्वेखाली विहीरीत किंवा विषाचा घोट घेऊन जिवनच संपवतात व हे सर्व मोबाईल मुळे.
हमारे जमानेमे मुल खेळत आजी आजोबा जवळ दोन दोन तास बसुन गोष्टी ऐकत व त्यातुन छान संस्कार मिळत व वळणदार मुले मुली सर्वञ दिसत. आता तोंड पॅक करून मुली जात येत असतात ही कोण कुणा सोबत काहीच कळत नाही. आई बाप संसारात व कष्टात अडकलेले असतात व हे मोकाट फिरतात व हळुहळु आय फोन साठी बापाला ञासुन सोडतात व लाख रूपयाचा फोन घेऊन लाख मोलाचे आयुष्य मातीत घालतात.
एक फायदा पण आहे. लग्नाच्या पञीका नातेवाईकांना पाठवायचे संकट. काही पोष्टाने पण त्या बर्याच वेळा लग्ना नंतर पोहचत होते. चार मोटर सायकली चार दिशांना पाठवायच्या हे आठ लोक चार मुक्काम करून पञीका पोहचत्या करून कारगील जिंकल्या सारखा आनंद साजरा करीत. पण मोबाईल मुळे सार्वजनिक आमंञण ओळख असो नसो सार्वजनिक ग्रुप व स्टेटसला पञीका टाकुन थिल्लर पणा होत आहे. पर्सनल नंबर वरचे कळवावे पण नाही. कोवीडमध्ये मोबाईल वरच शाळा सुरू झाल्या व तेथेच घात झाला. अभ्यास करणारे विस टक्के व बाकी फालतुक बघणारे ऐशी टक्के व परीक्षा न देता सरसगट पास केल्याने शाळेचा गंभीरपणा संपला. मोबाईल मुळे आर्थीक फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढत आहेत याचा विचार होणे गरजेचे आहे. मोबा.म्हणजे चहा पेक्षा किटली गरम असे आहे. पण आता तंञज्ञ प्रचंड प्रगत झाले असल्याने हे होईल का. तर अवघड आहे. आपले अचानक खवळलेले मोदी साहेब अर्ध्या राञी मोबाईलवर देशाला संदेश देतात मग बंद कसे होईल. सर्व कारभार ऑन लाईन झाला बँकेत न जाता व्यवहार होतात व त्यात थोडा धोका वगळला तर पारदर्शी व्यवहार होतात. पेपर लेस कारभार नक्कीच चांगला आहे. सरकारने फक्त चुकीचे सर्व अ‍ॅप बंद करावेत .अश्लीश प्रकार दिसणार नाहीत मग हरकत नाही पण हेच अ‍ॅप जास्त वापरले जातात हे दुर्दैवच आहे. फक्त चुकीचा वापर थांबला तर मोबाईल सारखी छान व्यवस्था नाही. चौथा स्थंब पेन कागद विसरला व सर्वच मोबाईल वर काम होत आहे. चुकीचे संदेश काही मुर्ख पाठवतात व समाजात गोंधळ होतो याचा बंदोबस्त झाला पाहीजे.
मोबाईल शिवाय शक्य नाही कारण अंगवळनी पडले आहे. म्हणजे धरल तर चावत व सोडल तर पळत असे झाले. मुल रडायला लागत आईला कामच करू देत मग मोबा .दिला तर कार्ट खुष आई कामात मग्न पण हळुहळु ते पोरग मोबाईल दिला नाही तर हंबरडाच फोडत. नको म्हणुन चालणार नाही ते नुकसान पण मोठेच आहे. सर्व पेच वाढला आहे. फक्त पालकांनी कमी वापर करावा व मुलांना कमी वापर करायला थोडी सक्ती करावी हिच पर्याय आहे.

The future is in jeopardy due to mobile phones.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार…

- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…

9 minutes ago

नाठाळांच्या माथी हाणा काठी!

- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…

21 minutes ago

ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरूपी पर्यटकांचा ओघ वाढावा

- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…

27 minutes ago

खड्ड्यांचे पाप कोणाचे?

- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…

36 minutes ago

ऊर्जेची बचत, यशाची गुरुकिल्ली!

- जगन घाणेकर  वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…

54 minutes ago

फ्रेंड्स

नीट पेपरफुटीवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर, व्हिडिओद्वारे संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी जेन-झेड…

1 hour ago