नाशिक

दरीआई माता डोंगर भागात सलग सातवा भीषण वणवा; कारवाईची मागणी

पंचवटी : प्रतिनिधी
दरीआई माता देवस्थान परिसरातील डोंगरावर दि. 1 जून 2026 रोजी सायंकाळी पुन्हा भीषण वणवा लागला होता. हा गेल्या काही दिवसांतील याच भागातील सलग सातवा वणवा असल्याने प्रशासनाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी दरीआई माता वृक्षमित्र परिवार, राह फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आली आहे.
वन विभाग, दरीआई माता वृक्षमित्र परिवार, अनेक संस्था, तसेच स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षे मेहनत घेऊन जगवलेली शेकडो झाडे, तसेच मोर, ससे, पक्षी, सरडे यांसह विविध वन्यजीव या आगीत होरपळून गेले आहेत.
जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक वन्यजीव बेघर झाले आहेत. 14 मे रोजी पिंपळ टेकडीला लागलेल्या वणव्यातून परिसर अजून सावरत असतानाच पुन्हा आग लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. दरीआई माता वृक्षमित्र परिवार व राह फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व वणवा आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
सलग सात वेळा एकाच भागात वणवे लागणे हा निव्वळ योगायोग नसून घातपात असल्याचा स्थानिक नागरिक व पर्यावरणमित्रांनी संशय व्यक्त केला आहे.

नागरिकांच्या मागण्या अशा…

1. घटनेचा तातडीने पंचनामा करून अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करावा. 2. पिंपळ टेकडी, लोखंडे वस्ती व दरीआई माता डोंगर परिसरात कायमस्वरूपी गस्त सुरू करावी व सीसीट्रॅप कॅमेरे बसवावेत. 3. दोषी आढळणार्‍यांवर भारतीय वन कायदा 1927 व भारतीय दंड संहिता कलम 435 अंतर्गत कठोर कारवाई करावी.

दरी ग्रामस्थांना आवाहन

दरीआई माता वृक्षमित्र परिवाराने सर्व दरीकर नागरिकांना आवाहन केले आहे की, आपला डोंगर आपणच वाचवायचा आहे. सर्वांनी जागरूक राहून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे. आग किंवा धूर दिसल्यास तत्काळ संपर्क साधा. वन विभाग टोल फ्री क्रमांक : 1926, अग्निशमन दल : 101, दरीआई माता वृक्षमित्र परिवार, राह फाउंडेशन.

Seventh consecutive severe wildfire in Dariai Mata mountain area; Demand for action

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago