पाच अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल
सिडको : प्रतिनिधी
मटण मोफत देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी चिकन-मटण विक्रेत्यासह त्याच्या भावाला मारहाण केल्याची घटना आडगाव परिसरात घडली. या मारहाणीत दुकानदाराच्या पोटावर धारदार वस्तूने वार करण्यात आले, तर त्याच्या भावाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहम्मद खालीक सलीम खाटीक (वय 26, रा. हनुमान मंदिरामागे, मराठानगर, नांदूर गाव, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार आडगाव शिवारातील राऊत मळा परिसरात सादिक चिकन शॉप येथे फिर्यादी, त्यांचा भाऊ सादिक इस्माईल आणि मेहुणा अदनान हे मटण विक्री करीत होते. यावेळी पाच अनोळखी व्यक्तींनी दुकानात येऊन चार किलो मटणाची मागणी केली. त्यावर पैसे न देता मटण मिळणार नाही, असे फिर्यादीने सांगितल्याचा राग आल्याने संबंधितांनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर दुकानाजवळ असलेल्या फरशी कापण्याच्या हत्याराने फिर्यादीच्या पोटावर वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या भावालाही दोन्ही पायांवर मारहाण करून गंभीर दुखापत केली. या मारहाणीत त्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील पुढील तपास करीत आहेत.
Shopkeeper assaulted for refusing to provide free mutton
जिल्ह्यातील 4 लाख 47 हजार शेतकर्यांच्या खात्यावर पाच हजार नाशिक : प्रतिनिधी अनियमित पावसामुळे खरीप…
हनुमान चालीसा केंद्रांच्या माध्यमातून 25 कोटी लोकांपर्यंत आरोग्यसेवा : डॉ. प्रवीण तोगडिया नाशिकरोड : विशेष…
दीपावली सुट्टीमुळे राज्यासह परराज्यातून भाविक गडावर दाखल सप्तशृंगगड : प्रतिनिधी दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी…
आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मोबाइल, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा…
ग्राहकांंची चांदी, आगामी लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी संधी नाशिक : प्रतिनिधी दीपोत्सवाचा उत्सव संपताच देशांतर्गत आणि…