शालेय शिक्षणमंत्री भुसेंचा धक्कादायक आरोप
पटसंख्येवरून अधिकार्यांना कानपिचक्या
नाशिक : प्रतिनिधी
महापालिका शाळेत गोरगरिबांची मुले शिक्षणासाठी येतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे शिक्षकांनी लक्ष देऊन विद्याथ्यार्ंसह पालकांना मनपा शाळांकडे आकर्षित करावे. मनपा शाळा बंद पडाव्यात, अशा पद्धतीने काहींचे प्रयत्न असल्याचा खळबळजनक आरोप शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केला. मात्र, एकही शाळा बंद होणार नाही किंबहुना आणखी शाळा कशा पद्धतीने सुरू होतील यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मंत्री भुसे यांनी मनपा शिक्षण विभागाला दिल्या.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मंत्री दादा भुसे यांनी शिक्षण विभागाचा आढावा बैठक घेतली. तीत त्यांनी शिक्षण विभागाला सूचना केल्या. याप्रसंगी उपमहापौर विलास शिंदे, शिवनेता गटनेते अजय बोरस्ते, नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, मनपा प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी आदी उपस्थित होते.
भुसे पुढे म्हणाले, की शाळांचा विकास करणे ही आपली सर्वोच्च जबाबदारी आहे. महानगरपालिका शाळांची पटसंख्या 40 हजारांवरून 29 हजारांपर्यंत खाली येणे, ही बाब भूषणावह नाही. त्यामुळे शिक्षक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करून ही पटसंख्या पुन्हा 40 हजारांच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवा. बैठकीच्या सुरुवातीला मंत्री भुसे यांनी मनपा शाळांतील ज्या विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड झाली आहे, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना बॅग वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेले ’गोदावरीचे शब्दपुष्प’ हे कवितांचे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी महापालिका शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती सभागृहास दिली. शाळा बंद करून त्यांच्या इमारती इतर कामांसाठी देण्याची प्रवृत्ती थांबवावी. उलट येणार्या काळात सर्व नगरसेवकांची बैठक लावून प्रत्येक शाळेचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. गरजेनुसार नवीन शाळा किंवा वाढीव वर्गांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर केल्यास त्यांना एका तासाच्या आत मंजुरी दिली जाईल, असे ते म्हणाले.
अशैक्षणिक कामांमध्ये कपात
शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत बोलताना त्यांनी प्रत्येक शाळेत विद्यार्थिनींसाठी स्वच्छ स्वच्छतागृह असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आणि त्यासाठी जिल्हा, राज्यस्तर किंवा लोकसहभागातून निधी प्राप्त करण्याचे निर्देश दिले. शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांमध्ये 25 टक्के कपात करण्यात आली असून, उर्वरित कामांबाबतही शासन विचार करत असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली. पदोन्नती प्रक्रिया राबवून पवित्र पोर्टलसाठी जाहिरात देऊन दोन महिन्यांत शिक्षक भरती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांविरोधात तक्रारी आल्यास थेट मान्यता रद्द
काही खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेण्याबाबत सक्ती केली जाते. त्याविरोधात पालकांनी तक्रार केल्यास त्या शाळेवर त्वरित कारवाई करण्याचा इशारा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला. काही खासगी शाळांमध्ये मुलींना गंध लावणे, बांगड्या घालणे याला प्रतिबंध घातला जात असल्याचे चित्र असून, कोणत्याही पालकाने यासंदर्भात तक्रार केल्यास 24 तासांत शाळेवर कारवाई केली जाईल. आमच्या प्रभागातील शाळांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होते. आमच्या प्रभागातील शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत, अशा विविध तक्रारी यावेळी नगरसेवकांनी केल्या. त्यावर भुसे यांनी मनपा शिक्षणाधिकार्यांना त्याबाबत सूचना दिल्या. पावसाळ्यापूर्वी मनपाच्या शाळांची अवस्था सुधारली पाहिजे, यासाठी आपण स्वत: लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिन्नर : प्रतिनिधी एप्रिल महिन्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने सिन्नर तालुक्यातील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले…
निफाड उपविभागीय अधिकार्यांचे नगरपालिकांना आदेश सिन्नर : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, सिन्नर आणि…
इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरदर्या परिसरातील आदिवासी भागातील “डोंगरची…
ग्रामस्थांचा संताप; बिबट्याच्या संख्येत झपाट्याने वाढ दिंडोरी : अशोक केंग तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी नागरिक दहशतीखाली…
भोंदूबाबावर गुन्हा दाखल निफाड /लासलगाव : वार्ताहर घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा…
भारतीय संस्कृतीच्या पायाभूत रचनेत ‘ग्राम’ ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. प्राचीन काळापासून गाव हे सामाजिक, आर्थिक…