राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

बिहारमधील लखीसराय मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू

लखीसराय :
बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील ’अशोक धाम’ येथे चेंगराचेंगरीची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, या घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे; मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी ’जलाभिषेक’ करण्यासाठी सुमारे 50,000 भाविक तिथे जमले होते, त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली.
चेंगराचेंगरीनंतर भाविक घाबरून धावू लागले आणि अनेकजण एकमेकाखाली चिरडले गेले. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अचानक गर्दी वाढल्याने घटना घडली.लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी सांगितले, ही घटना सकाळी साडेसहा वाजता घडली. मंदिरात अचानक गर्दी वाढली. स्थानकावर दोन गाड्या आल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक मंदिर परिसरात पोहोचले.
सकाळी भाविक रांगेत उभे असतानाच बॅरिकेड्स कोसळले. लोक एकमेकांवर पडल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.

Stampede at a temple in Bihar’s Lakhisarai; seven devotees dead.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

15 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

15 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

15 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

16 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

16 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

16 hours ago