नाशिक

बिटको रुग्णालयात नवजात शिशूंसाठी अत्याधुनिक कक्ष

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात नवजात शिशूंसाठी अत्याधुनिक व सुसज्ज कक्ष उभारण्यात आला आहे. लवकरच तो नवजात शिशूंच्या सेवेत दाखल होणार आहे.
या कक्षात खासगी रुग्णालयांच्या तोडीच्या सुविधांमुळे आता सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या शिशू कक्षात एकूण 25 नवजात बाळांसाठी अत्याधुनिक काचेच्या इन्क्युबेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बाळासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे, स्वच्छता व सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. मातांसाठी स्वतंत्र व सुसज्ज विश्रांती कक्ष उपलब्ध करून देण्यात आल्याने आई-बाळाची एकत्रित काळजी घेणे अधिक सुलभ होणार आहे.
कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांची स्वतंत्र व्यवस्था असून, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ 24 तास सेवेत राहणार आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक सर्व अत्याधुनिक यंत्रणा येथे सज्ज ठेवण्यात आली आहे. या सुविधेमुळे नाशिकरोडसह ग्रामीण भागातील नवजात शिशूंच्या आरोग्यसेवेत मोठी भर पडणार आहे. सदर शिशू कक्ष सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तो सुरू झाल्यानंतर गरीब व सर्वसाधारण कुटुंबांसाठी जीवनदायी ठरणार
आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात अत्यंत सुसज्ज शिशू कक्ष उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. ही सुविधा नवजात बालकांसाठी जीवनदायी ठरणार असून, मातांना व बाळांना योग्य उपचार मिळतील. विशेषतः मध्यमवर्गीय व गरजू रुग्णांना यामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
– डॉ. कांचन लोकवाणी, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक, बिटको रुग्णालय

नवजात शिशूंवर असे होणार उपचार

कमी वजनाची किंवा अकाली जन्मलेली बाळे स्वतःचे तापमान राखू शकत नाहीत. इन्क्युबेटरमध्ये योग्य ऊब दिली जाते
बंद व स्वच्छ वातावरणामुळे बाहेरील जंतूंपासून संरक्षण मिळते.
कावीळ किंवा श्वसनाच्या अडचणींत ऑक्सिजन सपोर्टची सुविधा.
बाळाच्या त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी आवश्यक आर्द्रता राखली जाते.
हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास व तापमानावर सतत वैद्यकीय देखरेख.

 

State-of-the-art room for newborns at Bitco Hospital

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago