नाशिक

सप्तशृंगगडावर अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

85 लाखांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सप्तशृंगगड परिसरात स्वच्छता व पर्यावरण संरक्षणासाठी नाशिक जिल्हा परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गड परिसरात अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 85 लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे तांत्रिक मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गड परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प साकारण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून (सन 2025-2026) या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. संबंधित प्रकल्पासाठी एकूण 84 लाख 94 हजार 602 रुपयांचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, ही मंजुरी लवकरच मिळण्याची दाट
शक्यता आहे.
मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. सप्तशृंगगड येथील भक्तनिवासाजवळील वनविभागाच्या जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गड परिसरातील सांडपाण्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन होणार असून, दूषित पाणी परिसरात साचण्याची समस्या कमी होईल. परिणामी, पर्यावरणीय समतोल राखला जाईल तसेच भाविक व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सप्तशृंगगड परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक होईल. भाविकांसाठी मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे फायदे

दूषित पाणी नद्या व जलस्रोतांमध्ये जाण्यापासून प्रतिबंध, रोगराई कमी होण्यास मदत.
शुद्ध केलेले पाणी बागकाम व स्वच्छतेसाठी वापरण्याची सुविधा,
र्यावरण संरक्षण व स्वच्छतेत सुधारणा
प्रकल्प सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच कार्यान्वित करण्याचा प्रयत्न

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago