filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0;
पंचवटी : प्रतिनिधी
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या सुनीता विश्वकर्मा (उपनगर) या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह बॅगेत भरून नदीकिनारी फेकून देणारा मुख्य संशयित आरोपी गोपीनाथ रवींद्र गोसावी (वय 33, रा. राहुलनगर, उपनगर, नाशिक) याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याला कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथून ताब्यात घेतल्यानंतर आता आडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे व उपनगर पोलिस ठाण्याचे जयंत शिरसाठ यांनी शुक्रवारी (दि.19) संयुक्त पत्रकार परिषद घेत या अत्यंत क्लिष्ट आणि संवेदनशील गुन्ह्याचा छडा लावण्यात आल्याची माहिती दिली.
महिलेची ओळख पटवणे आणि आरोपीचा माग काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासाची चक्रे फिरवत असताना उपनगर पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार मिलिंद बागूल यांना त्यांच्या खास खबर्यांकडून अत्यंत गोपनीय व महत्त्वाची माहिती मिळाली. मृत महिला ही सुनीता विश्वकर्मा असून, तिचा प्रियकर गोपीनाथ गोसावी यानेच अनैतिक संबंधातून तिचा खून केला आहे आणि तो नाशिकमधून पळून गेला आहे, हे बागूल यांनी अचूक शोधून काढले.
तांत्रिक विश्लेषण व मानवी कौशल्याचा वापर करून आरोपीला कर्नाटकातून बेड्या ठोकल्या. आरोपी गोपीनाथ गोसावी याला कर्नाटक येथील न्यायालयात हजर करून ‘ट्रान्झिट रिमांड’अंतर्गत नाशिकच्या आडगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. आरोपीनेे गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिस कोठडीदरम्यान या खुनामागील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
Suspect in woman’s murder remanded to police custody
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…