ग्रामीण भागात चुलींना मागणी; प्रतीक्षेनंतरही सिलिंडर मिळेना
मनमाड : प्रतिनिधी
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसू लागला आहे. युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत होऊन गॅसटंचाई निर्माण झाली आहे. मनमाड शहरासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गॅस सिलिंडर मिळणे कठीण झाल्याने, नागरिकांनी पुन्हा एकदा पारंपरिक मातीच्या चुलीकडे धाव घेतली आहे.
ग्रामीण भागात चुली बनवणार्या हातांना काम मिळायला सुरुवात झाली आहे. मातीच्या चुलींची मागणी वाढल्याचे चूल बनवणार्या कामगारांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढल्याने इंधनाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर झाला आहे. गॅस एजन्सीकडे नंबर लावूनही अनेक दिवस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ऐन सणासुदीच्या काळात गॅस संपल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिकांनी मातीच्या चुली वापरण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मातीच्या चुली बनवणार्या कारागिरांकडे सध्या ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
गॅस सिलिंडरसाठी 15-15 दिवस वाट पाहावी लागत आहे. त्यातच किमतीही वाढत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. “गॅस कधी येईल, याचा भरवसा नसल्याने अखेर पुन्हा मातीच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे,” अशी प्रतिक्रिया काही गृहिणींनी दिली.
आम्ही पारंपरिक पद्धतीने मातीकाम करून उदरनिर्वाह चालवत आहे. आमच्या पिढ्यान्पिढ्या मातीकाम करून पोट भरत आहे आणि आम्हालाही तेच करावे लागत आहे. अनेक दिवसांपासून मातीची चूल आणि इतर मातीच्या वस्तू हद्दपार झाल्या होत्या. मात्र, आता युद्ध सुरू आहे. यामुळे गॅस मिळत नाही. आता पुन्हा महिलांकडून मातीच्या चुलीला मागणी होत आहे. युद्धामुळे आम्हाला सुगीचे दिवस आले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
-जिजाबाई मोरे, कुंभार कारागीरसुरुवातीला गॅस मिळत नव्हता तेव्हा आम्ही चूल वापरत होतो. मध्यंतरी गॅस मुबलक प्रमाणात मिळत होता. त्यामुळे चुली बंद केल्या होत्या. आता मात्र युद्धामुळे गॅस मिळत नाही. 25 दिवसांनी नंबर लावायचा आणि त्यानंतर गॅस मिळणार असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. सध्या महिना महिना वाट बघून गॅस मिळत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
आली आहे.
-पुष्पा परदेशी, गृहिणी
The Iran-Israel war is heating up.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…