संपादकीय

तेल वाहतुकीला ब्रेक लागल्यामुळे जगावर अभूतपूर्व संकट!

जगाची दैनंदिन तेल, इंधन वाहतुकीची गरज 10 कोटी बॅरल्स एवढी आहे. त्यातील सुमारे 20 टक्के खनिज तेलाचा पुरवठा होमुर्झ सामुद्रधुनीतून होतो. होमुर्झ सामुद्रधुनीतून होणारा निम्म्याहून अधिक तेलसाठा भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांना होतो. तो तेल पुरवठा करण्यास अडथळा आल्यास या चार महत्त्वाच्या देशांचा तेल पुरवठा ठप्प होतो आणि त्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर अनेक बाजूंनी ताण पडून त्या अर्थव्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी त्या देशाच्या अर्थव्यवस्थापकांवर येऊन पडते. इतिहासात मागे वळून पाहिल्यास सन 1973 मध्ये योम किप्पूर युद्धात जगातील सर्व बाजारपेठा हादरल्या होत्या. सन 1978-79 मध्ये इराण क्रांतीच्या वेळी 50 ते 60 लाख बॅरल्सचा प्रतिदिन फटका बसत होता.
तर इराण-इराक युद्धात दररोज 40 लाख बॅरल्स तेलपुरवठ्याचा फटका बसून तेल वाहतूक ठप्प झाली होती. त्यावरून सध्या होमुर्झ सामुद्रधुनीतून होणारा दोन कोटी बॅरल्स प्रतिदिन तेलपुरवठ्याचा किती गंभीर परिणाम होत असेल, याची कल्पना केलेली बरी. भारताच्या दररोजच्या 52 ते 54 लाख बॅरल्स तेलपुरवठ्याचा मार्ग होमुर्झ सामुद्रधुनीतून होतो. युद्धापूर्वी सुमारे 21/22 लाख बॅरल्स तेलपुरवठा बहुतांशी होमुर्झ सामुद्रधुनीतून होत असे. त्यामुळे भारताची परिस्थिती किती चिंताजनक झाली असेल, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार तेलाच्या किमती 10 टक्क्यांनी वाढल्यास महागाई वाढू शकते. विकासदर मंदावतो. सध्याच्या युद्धाचे चित्र पाहता इराणकडून बहरीनमधल्या रिफायनरीज कॉम्प्लेक्सवर हल्ले सुरू ठेवल्याने बहरीनच्या सरकारी कंपनीने त्यांच्या ऑपरेशन्सवर मेजर फोर्स लागू केले आहेत.
दरम्यान, अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ 18 टक्क्यांपर्यंत कमी केल्यानंतर भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे; पण तोही रशियाकडून तेल इंधन खरेदी न करण्याच्या अटींवर. परंतु मध्य-
पूर्वेतील युद्ध परिस्थितीत काही फरक पडेल असे वाटत नसल्याने तेलपुरवठा करणार्‍या कंपन्यांमधील करारांनुसार इंधन दरांत वाढ होण्याच्या शक्यता अधिक असून, एक-दोन दिवसांत तेलाच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलर्सच्या वर गेल्या आहेत. याच कारणांनी इंधन दर आणि त्याचा पुरवठा यांच्यात मोठे फरक घडवून येतील, असे अंदाज वर्तवले जात आहेत. त्याचा परिणाम भारतीयांना इंधन खरेदी आणि महागाई यांचा मिलाफ करणे कठीण होऊन बसणार आहे.

An unprecedented crisis for the world due to the break in oil transportation!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago