आरोग्य

पावसाळा व आपले आरोग्य

पावसाळा म्हटलं की, हिरवळ, नद्या- नाल्यांमधून वाहणारे झरणे व धबधबे, पावसाळी सहली व चहा, भजीचा आस्वाद. तसेच पावसाळा म्हटलं की चिक-चिक, रस्त्यावरचे डबके, इकडे-तिकडे साचलेले पाणी, निसरड्या वाटा, दमटपणा व सूर्यदर्शनाचा अभाव. या सर्व कारणास्तव पावसाळा कितीही आल्हाददायी वाटत असला तरी तो घेऊन येतो विविध आजार व आरोग्याशी निगडित समस्या.
तर पावसाळ्यातील आरोग्याविषयी समस्या या दोन प्रकारात मोडतात. एक म्हणजे हमखास पावसाळ्यात फोफावणारे संसर्गजन्य आजार आणि दुसरे म्हणजे काही असंसर्गजन्य समस्या
हवामानातील बदल, उष्णतेच्या लाटा, ग्लोबल वॉर्मिग, अतिवृष्टी/अल्पवृष्टी, शहरीकरण, रस्त्यांची दुरवस्था, अनियंत्रित बांधकाम यामुळे पावसाळ्यातील आजारांचे स्वरूप पूर्वीपेक्षा वेगळे आणि अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
संसर्गजन्य आजारांचा विचार केला तर पूर्वी पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, जुलाब किंवा डेंग्यू, मलेरिया एवढेच आजार प्रामुख्याने दिसत असत. परंतु, आज परिस्थिती बदलली आहे. व्हायरल ताप, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, व्हायरल कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे) आणि दूषित पाण्यामुळे होणारे अतिसार, टायफॉइड व कावीळ यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक तापाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. संसर्गजन्य रोग हे दूषित पाण्यातून अथवा खाण्याद्वारे, तसेच हवेतून पसरतात. यामध्ये प्रामुख्याने साधा फ्लू, सर्दी पडसे, खोकला, न्यूमोनिया, उलट्या, जुलाब, कॉलरा, टायफॉइड या आजारांचा समावेश होतो. याशिवाय डास किंवा इतर जिवाणूमुळे उद्भवणारे काही आजार जे सौम्य अथवा गंभीर स्वरूपाचे असू शकतात यांचा प्रसारदेखील वाढत आहे. यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पॉरोसिस, चिकनगुनिया यांचा समावेश होतो. या तिन्ही आजारांमध्ये प्रमुख लक्षण ताप असतो. म्हणून नेमका कोणता ज्वर जडलाय, त्यातील धोक्याची लक्षणे कोणती, इलाज कधी व कोणाकडून करून घ्यावा, याबाबत सजगता गरजेची आहे.
डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस : डेंग्यू : पावसाळ्यात सर्वत्र पाणी साचते, डासांची पैदास वाढते आणि त्याचबरोबर डेंग्यूचा धोकादेखील वाढतो. अनेकदा डेंग्यूला साधा व्हायरल ताप समजून घरच्या घरी औषधे घेतली जातात. पण डेंग्यू हा गंभीर आजार ठरू शकतो.
डेंग्यूबाबत एक मोठा गैरसमज म्हणजे तो फक्त घाणीत किंवा अस्वच्छतेत होतो. प्रत्यक्षात डेंग्यूचा डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतो. घराभोवती, टेरेसवर, कुंड्यांमध्ये, कूलरमध्ये किंवा टाक्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एकदा पाणी साठणारी ठिकाणे रिकामी करून स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डेंग्यूची लक्षणे म्हणजे अचानक जास्त ताप येणे, तीव्र डोकेदुखी, अंग आणि सांधेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, त्वचेवर लालसर पुरळ, रक्तस्रावाची लक्षणे, जसे की नाकातून रक्त येणे किंवा हिरड्यांतून रक्त येणे. ही लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधे घेऊ नयेत. विशेषतः वेदनाशामक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक ठरू शकते. डेंग्यू सौम्य प्रकारात आढळतो आणि गंभीर स्वरूपातदेखील, ज्यामध्ये शरीरांतर्गत रक्तस्त्राव होणे (डेंग्यू हेमोराजिक फिव्हर) अथवा शरीरातील ब्लडप्रेशर अति कमी होणे.)
मलेरिया : मलेरिया हादेखील डासांमुळे होणारा आजार आहे. मलेरिया म्हणजे फक्त थंडी वाजून ताप येणे नाही, तर प्रत्यक्षात त्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. ताप, थंडी, घाम येणे, डोकेदुखी, उलटी, अशक्तपणा आणि कधी कधी पोटदुखी ही लक्षणे दिसू शकतात. मलेरियामध्ये काही वेगळे प्रकार आहे. उशीशलीरश्र ारश्ररीळर म्हणजे मेंदूला बाधित करणारा फाल्सिपेरम मलेरिया हा एक गंभीर आजार आहे.
लेप्टोस्पायरोसिस : लेप्टोस्पायरोसिस हा आजार अनेकदा दुर्लक्षित राहतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून, चिखलातून किंवा दूषित पाण्याच्या संपर्कातून हा आजार होऊ शकतो. उंदीर, इतर काही जनावरे यांच्या लघवीमुळे पाणी दूषित होते आणि त्या पाण्याच्या संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो.
शहरात हल्ली पाणी तुंबण्याचे प्रकार वाढत आहेत. साचलेल्या पाण्यातून चालणे, पायाला जखम असताना दूषित पाण्यात जाणे किंवा स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे यामुळे संसर्ग
होऊ शकतो.
लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे : ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, डोळे लाल होणे, उलटी किंवा जुलाब.
काही गंभीर प्रकरणांमध्ये कावीळ किंवा मूत्रपिंडावर परिणाम, फुफ्फुसावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो. ही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. वेळेवर उपचार न झाल्यास हा आजार गंभीर ठरू शकतो.
कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत?
तीन दिवसांपेक्षा जास्त ताप, तीव्र अंगदुखी किंवा सांधेदुखी, उलट्या किंवा जुलाब, श्वास घेण्यास त्रास, लघवी कमी होणे, डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे, अंगावर पुरळ किंवा रक्तस्राव, तीव्र अशक्तपणा किंवा गुंगी अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही वेळा हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळदेखील येऊ शकते. तर हे सर्व आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्यांचा प्रतिरोध शक्य आहे.
विशेष काळजी कोणासाठी?
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार किंवा कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या गटांमध्ये संसर्ग गंभीर होण्याची शक्यता अधिक असते.
प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय
पावसाळ्यात या आजारांव्यतिरिक्तदेखील काही समस्या उद्भवू शकतात. रस्त्यावरील चिखल, पाणी यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघातांना ते निमंत्रण ठरते. अशा परिस्थितीत सावधपणे व सावकाश चालणे अथवा वाहने चालविणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापर करणे गरजेचे आहे.
तसेच पावसाळी सहलीला जाताना विशेष काळजी घेणे, जोखीम न पत्करणे, धोक्याची घंटा ओळखणे, फोटो व सेल्फी काढताना सावधपणा बाळगणे, प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत दुर्घटना टाळण्यासाठी.
अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे हवेत आर्द्रता अधिक असल्यामुळे रोज धुतले जाणारे कपडे नीट वाळत नाही. ओलसर कपडे घातल्यास किंवा पायांच्या बोटांमध्ये ऑल राहिल्यास बुरशीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून कपडे व्यवस्थित सुकल्याशिवाय घालू नये व बोटांमधील जागा नीट कोरडी करावी. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी ही बाब विशेष
महत्त्वाची आहे.

The Monsoon and Our Health

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

17 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

17 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

17 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

17 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

18 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

18 hours ago