महाराष्ट्र

ठाणे, मुंब्रा पोलिसांकडून नवजात बालक विक्रीचे रॅकेट उघडकीस

जालन्यापासून रत्नागिरीपर्यंत धावपळ करत अवघ्या 24 तासांत चिमुकल्याची सुटका

शहापूर : प्रतिनिधी

वीस दिवस झालेल्या एका चिमुकल्याला पैशांसाठी आईपासून दूर करून त्याच्या विक्रीचा संतापजनक प्रकार मुंब्रा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल दहा जणांना अटक केली आहे. जालन्यापासून रत्नागिरीपर्यंत धावपळ करत अवघ्या 24 तासांत बाळाला सुखरूप आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणारी अनिसा रफीक शेख (वय 19) ही मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करते. तिच्या अवघ्या वीस दिवसांच्या बाळाच्या विक्रीसाठी रेहान रिजवान शेख (वय 22) याने तिच्यावर दबाव आणल्याचा आरोप आहे. या बाळाचा सुरुवातीला अडीच लाख रुपयांना सौदा करण्यात आला होता. मात्र, हा प्रकार बाहेर उघड होऊ नये म्हणून फिर्यादीला एक लाख 95 हजार रुपये देण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर तिला आणि तिची बहीण अलकीशा यांना वायरने मारहाण करून ही रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात 5 नोव्हेंबर 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान बाळाची एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी ने-आण करण्यात आल्याचे आणि प्रत्येक टप्प्यावर त्याच्या विक्रीचा सौदा होत गेल्याचे समोर आले. सुरुवातीला अडीच लाख रुपयांना ठरलेला हा सौदा वेगवेगळ्या हातांतून जात साडेसहा लाखांपर्यंत पोहोचला होता. या प्रकरणातील आरोपी गोपीनाथ धोत्रे याला पोलिसांच्या एका पथकाने जालन्यातून ताब्यात घेतले, तर दुसर्‍या पथकाने रत्नागिरी येथून बाळाचा शोध घेत त्याला सुखरूप ताब्यात घेतले. अशा प्रकारे अवघ्या 24 तासांत बाळाला परत आणण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले. बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनामानुसार त्याला डोंबिवली येथील ‘जननी आशीष संस्था‘ येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. बाळाच्या पुढील संगोपनाबाबत बालकल्याण समितीच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाण्याप्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या सत्रांत धडक कारवाई करत एकूण दहा जणांना अटक केली आहे.
अटक केलेले आरोपी असे : ज्योती नरेश पाटील (वय 35), रेहान रिजवान शेख (22), फरहान ऊर्फ फरौ रेहान शेख (21), फरिदा अकबर सय्यद (52) आणि हुरना ऊर्फ हुस्ना अल्ताफ शेख (27), अनिता गोपीनाथ धोत्रे (42), सुनीता प्रवीण खैरनार (30), गोपीनाथ किसन धोत्रे (46), प्रतिभा प्रकाश परब (46) आणि शिल्पा प्रदीप साठे (34). दहा आरोपींना 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Newborn baby-selling racket unearthed by Thane, Mumbra police

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

ऐकणारे कान…

- सुप्रिया सुरवाडे सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती...? या शुष्क होत जाणार्‍या जगात...कोरड्या…

1 day ago

नरक चतुर्दशी

- जगन घाणेकर स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले,…

1 day ago

दीपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा!

- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्‍या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…

1 day ago

’स्वीकृत’च्या निवडणुकीतील फुसका फटका

- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…

1 day ago

बायबाय ‘सीआर सेव्हन’!

- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…

1 day ago

माळी कुटुंबाने दुःखाच्या अंधारात पेटवला माणुसकीचा दिवा

पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या…

1 day ago