महाराष्ट्र

राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेतून आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत असल्यामुळे राज्य सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे रामदास आठवले म्हणाले.
शिवसेनेचे 37 आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे मोठा गट शिंदेंसोबत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार, अजित पवार यांनी आमच्याकडे बहुमत आहे अशी भूमिका मांडणं अयोग्य आहे. आपल्याला बहुमत सिद्ध करण्याचा अधिकार आहे. पण इतके आमदार वेगळे झालेले असताना बहुमत असूच शकत नाही. त्यामुळे या सरकारला निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ते म्हणाले.

आमदारांना निलंबित करू शकत नाही

दरम्यान, शिंदेंसोबत असणार्‍या 16 आमदारांना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सांगितले जात असले तरी ते शक्य नसल्याचे आठवले म्हणाले. तो अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना नाही. 37 आमदारांचा गट दोन तृतियांश बहुमताने एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीला अजिबात धक्का लागू शकत नाही. व्हीप सभागृहात असतो. बाहेर नसतो. त्यामुळे एखाद्या बैठकीला हजर राहिले नाही, म्हणून त्यांना पक्षातून काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण त्यांची आमदारकी रद्द करण्याचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना नाही. असं त्यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीसांसोबत माझी चर्चा झाली आहे. चर्चेत त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला हा पक्षांतर्गत वाद आहे. त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. आम्ही सध्या वेट अँड वॉचमध्ये आहोत. आम्हाला कोणतीही घाई नाही. एकनाथ शिंदेंकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती रामदास आठवलेंनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याच्या प्रकरणावरून रामदास आठवलेंनी टीका केली आहे. रिपाइं एकनाथ शिंदेंबाबत सहानुभूती बाळगून आहे. त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गेलेले आमदार शिवसेनेकडे परत येतील अशी परिस्थिती अजिबात नाही. तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर तुम्ही करू शकता. पण दादागिरी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. दादागिरीचं उत्तर दादागिरीनं दिलं जाऊ शकतं. एकनाथ शिंदेंवर अन्याय होत असले, तर माझ्या पक्षाचे लोक त्यांच्यासोबत राहतील, असं आठवले म्हणाले आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago