गणेशोत्सव तोंडावर आला आहे, गोपाळकाला, दहीहंडी उत्सवाच्या तयारीला गोविंदा पथके लागले आहेत, सराव सुरू झाले आहेत. राज्यात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना सोमवारी मात्र दहिसर येथे दुर्दैवी घटना घडली. सरावादरम्यान सहाव्या थरावरून पडून एका बालगोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यावेळी सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचे समोर आले आहे आणि मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरवर्षी दहीहंडी उत्सव आला की थरावर थर रचण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. दरवर्षी होणार्या दुर्घटना, जाणारे निष्पाप बळी यांची गंभीर दखल घेत न्यायालयाने बंधने घालून दिली आहेत. मात्र, त्याचे गांभीर्याने पालन करण्याऐवजी आमच्याच सणांवर बंदी का? दहीहंडी विटी-दांडूने फोडायची का, असे नाहक दावे केले जातात. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा, खेळाडूंना विमा संरक्षण या सर्व गोष्टी स्वागतार्ह आहे. मात्र, एखादी दुर्घटना घडली तर त्या व्यक्तीचे आणि कुटुंबीयांचे आयुष्य बरबाद होते ते कायमचेच. आज अनेक पीडित विकलांग आयुष्य जगत आहेत, त्याविरुद्ध अनेक महिला आणि संघटना लढत आहेत. वेळ परत परत येत नाही, की जीवन परत परत मिळत नाही. ठाण्यात दहीहंडीवरून राजकारण रंगले. सणवारांना आलेले बाजारीकरणाचे स्वरूप, होणारी करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल यामुळे धार्मिक सणांचे पावित्र्य नष्ट झाले आहे आणि ते दुसरे, तिसरे कुणी नाही तर आपणच नष्ट केले आहे. धार्मिक सण-उत्सवांचे राजकीयीकरण झाले आहे. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.
दरवर्षी दहीहंडी उत्सव आला की, थरावर थर रचण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. त्यातूनही धार्मिक सणवार यांचे पावित्र्य जवळपास नष्टच झाले आहे आणि काळ, वेळप्रसंग, धार्मिक पावित्र्य यांना तिलांजली देत केवळ उन्माद, धांगडधिंगा, बेफामपणा या सदरात मोडणारे उत्सव साजरे करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांत सुरू झाली आहे. लाखो, करोडो रुपये खर्च करून नट-नट्या सेलेब्रिटी नाचवले जातात. यात धार्मिकतेचा कुठेही लवलेश नसतो की भाव नसतो. सगळा पैसा फेको तमाशा देखो असा काहीसा प्रकार सुरू आहे. थरांच्या बाबत दरवर्षी होणार्या दुर्घटना, जाणारे निष्पाप बळी यांची गंभीर दखल घेत न्यायालयाने बंधने घालून दिली आहेत. मात्र, त्याचे गांभीर्याने पालन करण्याऐवजी आमच्याच सणांवर बंदी का? दहीहंडी विटी-दांडूने फोडायची का, असे नाहक दावे केले जातात. मात्र, अशा नाहक साहसी खेळात आपल्याच धर्माचे जीव जातात, जखमी होतात.
आज दहीहंडी उत्सव म्हटला की प्रसंगाला विपरीत नाचगाण्यांचा बीभत्सक नाच, त्यावर बेफाम होऊन नाचणारी तरुणाई, त्यातून आपापसात होणारी स्पर्धा, हे सगळे पवित्र सणांना गालबोट लावते. विशेष म्हणजे, हे सगळे भव्यदिव्य उत्सव साजरे होत असताना करोडो रुपयांचा चुराडा होतो. एवढा पैसा खर्च करणार्यांकडे येतो कुठून? आजकाल तर स्वेच्छेने मिळणार्या वर्गणीची जागा जबरदस्तीच्या खंडणीत झाले आहे हे वास्तव आहे. अशाच उत्सवात एखादा राजकीय नेता भरसभेत तरुणाला उद्देशून तूला कुठली मुलगी आवडली तर सांग तिला पळवून नेऊन लग्न लावून देईन असे सार्वजनिकरीत्या सांगतो हे दहीहंडीसारख्या उत्सवात अपेक्षित आहे का? याचा कोणी विचार करायचा? आपणच आपल्या सणवारांचे पावित्र्य राखायचे नाही आणि संस्कृती जपायची नाही. धर्म जपायचा नाही आणि दुसर्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे. जे प्रशिक्षित गोविंदा मंडळे आहेत, ते सर्व प्रकारची काळजी घेऊन दहीहंडी उत्सव साजरा करतात. त्याचा आनंद घेतला जावा. आज राज्यातील आर्थिक परिस्थिती, जनतेची आर्थिक विवंचना बघता, राज्यापुढे गंभीर आव्हाने आहेत. अशावेळी करोडो रुपयांच्या बक्षिसांची, खर्चाची स्पर्धा याला मुरड घालून तोच पैसा जनतेच्या गरजांवर खर्च केला जावा, तीच आजची खरी गरज आहे. राज्याचे गंभीर प्रश्न बाजूला ठेवून प्रत्येक चॅनलवर दिवसाचे चोवीस तास उत्सवाचे प्रक्षेपण गरजेचे आहे का? सणवारांना आलेले बाजारीकरणाचे स्वरूप, होणारी करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल यामुळे धार्मिक सणांचे पावित्र्य नष्ट झाले आहे आणि ते दुसरे, तिसरे कुणी नाही तर आपणच नष्ट केले आहे.
डीजेचा दणदणाट आता कुणालाही नको आहे. यासाठी आता पुणेकर पुढे सरसावले आहेत. इतर ठिकाणीदेखील ‘डीजे’साठी जनजागृती होत आहे हे स्वागतार्हच आहे. शेवटी धार्मिक सण-उत्सव साजरे करताना धार्मिकता, पावित्र्य राखले गेलेच पाहिजे. सामाजिक स्वास्थ्य बिघडवून अशा पद्धतीचे धार्मिक सण-उत्सव हे कोणालाही मान्य नाहीत.
There should be absolutely no ‘deadly’ obsession with stacking tier upon tier.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…