संपादकीय

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं….दिस जातील दिस येतील, या गीताप्रमाणे प्रेमवीरांकडून आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचे तर जातीच्या भिंती झुगारून प्रेमासाठी वाट्टेल ते धाडस करावे तर लागते; परंतु घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले तर समाज किंवा घरचे आपल्याला स्वीकारत नाहीत. त्यामुळे प्रेमविवाह तर केला पुढे काय, हा प्रश्न पडतो. सुखी संसाराला आर्थिक पाठबळ तितकेच महत्त्वाचे असते. शासनाकडून आंतरजातीय विवाहासाठी अनुदान दिले जाते. या अनुदानामुळे अनेक जोडप्यांचा संसार सुखाचा होण्यास मदत झाली आहे.
प्रेम मैत्री आणि आपुलकीचा उत्सव आज व्हॅलेंटाइन डे दि. 14 साजरा होत आहे. प्रेमासाठी जातीच्या भिंती ओलांडून नाशिकमध्ये अनेक जोडपे आज स्वप्नातील संसाराचे पहिले पाऊल टाकत आहेत. सन 2025-26 मध्ये आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत 162 लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली असून, या मदतीमुळे त्यांचे स्वप्नातील संसार साकारण्यास मदत होणार आहे.
एकूण 81 लाख रुपयांच्या अनुदानातून समाजातील दुर्बल घटकांना विवाहासाठी आधार मिळाला आहे. अजूनही 60 अर्ज प्रलंबित असून, लवकरच त्यांनाही अनुदानाची भेट मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. जातीच्या भिंती झुगारून प्रेम आणि समानतेसाठी समाजात बदल घडत आहे.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या कार्यालयाद्वारे राबविली जाणारी आंतरजातीय विवाह योजना सन 2025-26 मध्ये आतापर्यंत एकूण 222 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये 1 एप्रिल 2025 पासून दि. 13 पर्यंत 81 लाख रुपये अनुदान दिले गेले असून, एकूण 162 लाभार्थ्यांना लाभ मिळाला, तर 60 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.
जाती-जातीतील तेढ कमी व्हावा, यासाठी शासनपातळीवर विविध योजना राबविण्यात येतात. सवर्ण आणि मागासवर्ग प्रवर्गातील विवाह करणार्‍यांना योजनेंतर्गत 50 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. सन 2025-26 मध्ये आतापर्यंत एकूण 222 लाभार्थ्यांपैकी 162 लाभार्थ्यांना मदत पोहोचली आहे. पीएफएमएस प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम देण्यात आली आहे.
समाजकल्याण विभागाच्या या उपक्रमामुळे आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे निधी वर्ग करते.

समानतेच्या पावलांनी प्रेम साकार;
आंतरजातीय विवाह योजनेत
162 जोडप्यांना मिळाला लाभ

असा करावा अर्ज

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात अर्ज संपूर्ण माहितीसह भरावा.
जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला / जन्म नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, स्थायी रहिवासी दाखला – वर आणि वधू महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक. समाजकल्याण विभागाकडे आलेल्या प्रस्तावाची छाननी केली जाते. ज्यात कागदपत्रे तपासली जातात. जोडप्याकडून संयुक्त बँक खाते, पासबुक, ओळखपत्र आदींची पडताळणी केली जाते. कागदपत्रांची सत्यता तपासल्यानंतर निधी खात्यावर पीएफएमएस प्रणालीद्वारे जमा होतो. या योजनेचा उद्देश सामाजिक समरसता वाढवणे आणि आर्थिक सहाय्य देणे हा आहे.

 

What else do you want from my life?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जुन्या वादातून युवकाचा कोयत्याने खून…या भागात घडली घटना

सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…

10 hours ago

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

1 day ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

1 day ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

1 day ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

1 day ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

1 day ago