पुरातत्त्व खात्याकडून गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना पत्र
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेला लाडूचा प्रसाद आता वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांना 20 रुपयांत दोन बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून देण्यात येत आहेत. मात्र, त्याबाबत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी आक्षेप घेतला आहे. बुंदीचे लाडू विक्रीसाठी मंदिर प्रांगणात दोन टपर्या ठेवल्या होत्या. त्र्यंबकेश्वर मंदिर वास्तू भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत असल्याने पुरातत्त्व खात्याची परवानगी घेतलेली नाही, या कारणास्तव लाडू विक्री थांबवण्याचे पत्र दिले होते. यामध्ये टपरी ठेवण्यास आक्षेप नोंदवला होता. त्यावर देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने तातडीने टपर्या बंद केल्या व टेबल-खुर्ची ठेवून लाडू विकी सुरू ठेवली. यावर आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मंडल औरंगाबाद, उपमंडल नाशिक यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यास पत्र पाठवले. त्यामध्ये संरक्षित स्मारकात लाडू विक्रीस मनाई केली असताना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ती सुरू ठेवली आहे. याबाबत त्यांच्यावर एफआयआर दाखल करावी, असे म्हटले आहे.
याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिस आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाविकांना बुंदीच्या लाडूचा प्रसाद बंद होणार की काय? अशी शंका व्यक्त होत आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…