नाशिक

घरफोडी, चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा; मुद्देमाल जप्त

सिडको : प्रतिनिधी
अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी व चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत दोन संशयितांकडून सुमारे चार लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम जप्त केली. या कारवाईत एका महिलेसह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर येथील शुभम पार्क परिसरात राहणार्‍या मंजू जाधव यांच्या घरातून सोने चोरीला गेल्याची तक्रार 2 ऑक्टोबर रोजी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी आशा रोहित सुर्ववंशी हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हेशोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आशा सूर्यवंशी हिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिच्याकडून 10 ग्रॅम सोन्याची लगड, चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख असा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसर्‍या प्रकरणात, संजय घोरपडे यांच्या घरातील सोफ्यामध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे डोरले आणि टॉप्स चोरीला गेल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणात भूषण सुनील शिंपी याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता.
गुन्हेशोध पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला. त्याच्याकडून 18 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे. दोन्ही प्रकरणांत एकूण चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी आणि पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या सूचनेनुसार गुन्हेशोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, उल्हास गांगुर्डे, सुभाष ठुबे, पोलीस शिपाई सागर जाधव, मधुकर राव, शिवाजी मुंजाळ, समाधान शिंदे, संजय सपकाळे, मयूर पवार, अनिल गाढवे, फरीद इनामदार, गणेश कोठुळे, तुषार मते, प्रवीण राठोड आणि वैभव एखंडे यांनी केली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश देसले करीत आहेत.

Two cases of housebreaking and theft solved; stolen property recovered.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

7 hours ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

7 hours ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

7 hours ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

7 hours ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

7 hours ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

7 hours ago