नाशिक

शहरात अनधिकृत शुभेच्छा बॅनर्सचा सुळसुळाट

महापालिकेचा कानाडोळा; अपघातांचा धोका

नाशिक : प्रतिनिधी
शहर पोलिसांनी कायद्याच्या बालेकिल्ल्याची मोहीम राबवितानाच शुभेच्छा फलक लावणार्‍यांवरही कायद्याचा बडगा उगारला होता. त्यामुळेच महापालिका निवडणुका होईपर्यंत होर्डिंगमुक्त शहर दिसत होते. परंतु, मनपा निवडणूक संपताच शहरात पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे.
रस्त्याच्या कडेला, दुभाजक, चौकाचौकांत शुभेच्छा फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शहरात अनधिकृत फलकांनी आणि चमकोगिरी करणार्‍यांनी मोठा उच्छाद मांडला आहे. महापालिकेची निवडणूक उरकल्यानंतर लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली आहे. नव्याने निवडून आलेल्या मंडळींबरोबरच विविध संघटना, संस्थांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींच्या अभिनंदनाचे फलक सध्या जागोजागी लागले आहेत. विशेष म्हणजे, काही फलक रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळे होतील असे लावण्यात आले आहेत. तर भरचौकात, दुभाजकांवर लावण्यात आलेल्या फलकांमुळे वाहने दिसत नाहीत. यातून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
शहरात मध्यंतरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अनधिकृत होर्डिंग लावणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. पोलिसांच्या कारवाईच्या धाकामुळे अनेक जण इतर राज्यांत गायब झाले होते. पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागालादेखील स्फुरण चढले होते. त्यांनीही अतिक्रमण निर्मूलनाबरोबरच अनधिकृत होर्डिंगविरोधात दररोज मोहीम हाती घेतली होती. त्यामुळेच गेले तीन ते चार महिने शहरात अनधिकृत शुभेच्छा फलक शोधूनही सापडत नव्हता. मात्र, आता संपूर्ण शहरात अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट पाहावयास मिळत आहे. ठक्कर बाजार परिसर, त्र्यंबक नाका, रेडक्रॉस चौक, डोंगरे वसतिगृह मैदान परिसर, अशोकनगर, गणेश चौक, सातपूर परिसर, पंचवटी या भागात अनधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत. यातील अनेक होर्डिंगला महापालिकेची परवानगीदेखील नाही. त्यामुळे महापालिकेचाही महसूल बुडत आहे.

अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून, रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई जितकी तत्परतेने केली जाते, तेवढी तत्परता महापालिका अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी दाखवत नसल्याने चमकोगिरी करणार्‍यांचे चांगलेच फावले आहे. केवळ चमकोगिरीसाठी लावण्यात आलेले हे फलक तातडीने हटविण्याची मागणी होत आहे.

 

Unauthorized greeting banners abound in the city

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

29 minutes ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

37 minutes ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

43 minutes ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

50 minutes ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

57 minutes ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

1 hour ago