महाराष्ट्र

एआयचा शेतीत वापर करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

मुख्यमंत्री : पन्नास लाख शेतकर्‍यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प

मुंबई : प्रतिनिधी
पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप-2026’ या उपक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी शुभारंभ करण्यात आला. ही केवळ एक स्पर्धा नसून शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ असल्याचे सांगत, राज्यातील सद्यःस्थितीतील 18 हजार शेतकरी गटांच्या माध्यमातून भविष्यात तब्बल पन्नास लाख शेतकर्‍यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी ’स्मार्ट शेती अ‍ॅप’चे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) शेतीत वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरत आहे. तसेच जमिनीच्या मालकी हक्कात नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता देण्यासाठी विधानमंडळात आगामी काळात ’महिला शेतकरी विधेयक’ मंजूर करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
गटशेतीमुळे शेतकर्‍यांचा मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे मागील वर्षीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. फार्मर कपमध्ये सहभागी झालेल्या गटांच्या सोयाबीन, कापूस आणि मका उत्पादनात सरासरी 71 टक्क्यांनी वाढ झाली
आहे.सामूहिक खरेदीमुळे कृषी निविष्ठांवर तब्बल 1,584 कोटी रुपयांची, तर मजुरीत एकरी सुमारे सहा हजार रुपयांची बचत झाली आहे. यावर भर देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, सामूहिक शेतीतून उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मोठी मदत मिळते. तसेच, राज्य शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कर्जमाफी व वीज सवलतींसारख्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
यंदाच्या वर्षी ’अल निनो’मुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता, पुढील 15 दिवसांत गावोगावी जलसंधारणाची, गाळ काढण्याची आणि पाणी अडवण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पाणी फाउंडेशनचे संस्थापक आणि अभिनेते आमिर खान यांनी केले. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांचे सक्षम होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला शेतकरी गट, कृषी अधिकारी आणि ’उमेद’च्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून गटशेतीतील त्यांचे प्रेरणादायी अनुभव जाणून घेतले व भविष्यात उत्कृष्ट काम करणार्‍या गावांना स्वतः भेट देणार असल्याचे आश्वासनही दिले.

Maharashtra is the first state in the country to use AI in agriculture.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago