अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास
नवी दिल्ली : प्रतिनिधी
राज्यसभेत ‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक 2026’ बुधवारी मंजूर करण्यात आले. या नव्या कायद्यानुसार, राष्ट्रगीत (जन गण मन) आणि राष्ट्रध्वजाप्रमाणेच आता ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतालाही कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे, ‘वंदे मातरम्’च्या गायनात हेतुपुरस्सर अडथळा आणणे किंवा त्याचा अपमान करणे हा आता फौजदारी गुन्हा मानला जाईल.
या विधेयकात तरतूद केल्यानुसार, जर कोणी ‘वंदे मातरम्’चा जाणीवपूर्वक अपमान केला किंवा ते गाताना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीला जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
1971 च्या मूळ ‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायद्या’त सुधारणा करण्यासाठी हे नवीन विधेयक आणले गेले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी 24 जुलै रोजी राज्यसभेत हे विधेयक मांडले होते, ज्याला काल अंतिम मंजुरी मिळाली. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू असताना मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षांनी ‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्द्यावर आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित पोलिस कारवाईवरून सभागृहात जोरदार निदर्शने केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून याप्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली. मात्र, या प्रचंड गोंधळातही सरकारने हे महत्त्वपूर्ण विधेयक राज्यसभेत मंजूर करवून घेतले.
‘Vande Mataram’ Bill passed in Rajya Sabha
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…