महाराष्ट्र

बारामती पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान

बारामती :
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. मतदारसंघातील एकूण 478 मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरक्षितता आणि पारदर्शकतेसाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, उपमुख्यमंत्री व महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह रिंगणात असलेल्या एकूण 23 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदानयंत्रांत बंद होणार आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे लोकप्रिय आमदार अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून, या पार्श्वभूमीवर येथे पोटनिवडणूक घेतली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. सुनेत्रा पवार यांच्यासमोर करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे पारडे जड मानले जात असले, तरी मतदानाचा नेमका टक्का किती राहतो आणि त्यांना किती मताधिक्य मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती मतदारसंघाच्या अंतिम मतदारयादीनुसार एकूण तीन लाख 84 हजार 579 मतदार नोंदणीकृत आहेत. निवडणूक कर्मचार्‍यांच्या वाहतुकीसाठी 165 वाहनांचा ताफाही तैनात करण्यात आला आहे.

Voting for Baramati by-election will be held today

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

4 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

4 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago