महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश

नाशिक: प्रतिनिधी

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दृष्टिपथात आल्या असून, नगर विकास विभागाने  आज राज्यातील महापालिका,नगर परिषद, नगर पंचायतसाठी  प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. अ, ब, व क महापालिकेसाठी चार सदस्य, नगर परिषदेसाठी दोन तर नगर पंचायतीसाठी एक सदस्यांचा प्रभाग अशी रचना राहणार आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑगस्ट मध्ये निवडणूक अधिसूचना निघू शकते असे सुतोवाच केले होते. नुकतीच न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते त्यामुळे आता प्रभाग रचना जाहीर करण्याच्या सूचना आल्याने निवडणूक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मंडळींच्या आनंदाला भरते आले आहे.

भाजप सरकारच्या काळात महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग होता, तोच पॅटर्न कायम ठेवण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया करण्याचे आदेश दिल्यानंतर नगर विकास विभागाने मंगळवारी रात्री राज्यामधील अ, ब आणि क या वर्गवारी मधील नऊ आणि ड वर्गातील 19 महापालिकेंच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहे. मात्र प्रभाग रचना करताना 2011 मधील लोकसंख्येचे ब्लॉक गृहीत धरले जाणार आहेत, या ठिकाणी झालेले नवीन रस्ते व हद्दीमधील किरकोळ बदलांचा समावेश केल्यास 2017 मधील रचनेनुसारच नवीन प्रभाग तयार होणार आहे. पुढील दोन महिने या प्रक्रियेमध्ये जाणार असून पावसाळा संपल्यानंतर मतदानाची प्रक्रिया होऊ शकते. कदाचित दिवाळी पूर्वी निवडणूक होऊ शकते.महाविकास आघाडीचे सरकार असताना  चार सदस्य प्रभाग रचना रद्द करून तीन सदस्य प्रभाग रचना केली होती. मात्र ओबीसी आरक्षण तसेच अन्य मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर निवडणुकीला स्थगिती आली. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवून पुढील चार महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या नगर विकास खात्याला निर्देश देत, आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना व अन्य प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री नगर विकास खात्याने दोन स्वतंत्र आदेश काढले आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक मेष : अडचणी वाढतील या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची…

9 hours ago

काशीविश्वनाथ मंदिराचा देखावा ठरणार यंदा शहराचे मुख्य आकर्षण

बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे भव्य देखावा उभारणीला सुरुवात नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी दरवर्षी अप्रतिम देखाव्यांसाठी ओळखल्या…

9 hours ago

मेघा आहेर ठरली सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू

मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात मनमाड : प्रतिनिधी भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग…

12 hours ago

बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला विहिरीत

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय मेशी : वार्ताहर खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी…

12 hours ago

शिंदेसेना स्थानिक स्वराज्य संस्थेचे फुंकणार रणशिंग!

मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य…

12 hours ago

तिसर्‍या श्रावण सोमवारच्या फेरीसाठी त्र्यंबकला भाविक दाखल

दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या तिसर्‍या सोमवारच्या ब्रह्मगिरी…

12 hours ago